AAP च्या नगरसेवकाला महिलांची भररस्त्यात चपलाने मारहाण; लाच मागितल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 05:57 PM2024-02-25T17:57:18+5:302024-02-25T17:58:03+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेतील हप्ता मिळवून देण्यासाठी प्रत्येकी रु. 10 हजारांची लाच मागितल्याचा आरोप.
AAP News: मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) नगरसेवकाला प्रभागातील महिलांनी भर बाजारपेठेत मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रभागातील अर्धा डझन महिलांनी पालिकेबाहेर त्या नगरसेवकाला घेराव घालून बेदम मारले. दरम्यान, नगरसेवकाने जीव वाचवत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्या महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. नगरसेवकाच्या सांगण्यावरुन 2 महिलांसह 4 जणांविरुद्ध मारहाणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षातून निवडून आलेले प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक जुगल मेहरा यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील हप्ता मिळवून देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप महिलांनी केला आहे. या घटनेनंतर नगरपालिकेतील भ्रष्ट नगरसेवकाची शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्योपुर नगरपालिका में AAP(आम आदमी पार्टी) के पार्षद की महिलाओं ने चप्पल से पिटाई कर दी। महिलाओं ने पार्षद पर पीएम आवास योजना की किश्त बैंक खाते में डलवाने के बदले रिश्वत मांगने का आरोप लगाया है। pic.twitter.com/ErECcYEdog
— Rakesh kumar patel (@NanheRakesh) February 25, 2024
ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. नगरपालिकेचा ‘विकास भारत संकल्प यात्रे’चा कार्यक्रम संपल्यानंतर नगरसेवक जुगल मेहरा यांना महिलांनी घेराव घातला आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलांनी नगरसेवकाचे शर्ट पकडून ओढले, नंतर चप्पल आणि गालात चापटा मारल्या. यावेळी उपस्थित लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला.
महिलांचे आरोप बिनबुडाचे : नगरसेवक
दरम्यान, नगरसेवक जुगल मेहरा यांनी लाच मागितल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. माझ्याविरुद्ध कट रचला गेला आहे. महिलांनी माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे.