शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

माणुसकीचे दर्शन! बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीला पोलीस अधिकाऱ्यानं घेतलं दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 2:12 PM

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडलेल्या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं.

Ujjain Minor Rape Case : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे घडलेल्या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आणलं. १५ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. अखेर तिनं राहुल शर्मा नावाच्या पुजाऱ्याकडं मदत मागितली अन् तो पुजारी तिच्यासाठी देवदूत बनला. राहुल शर्मा हा उज्जैनपासून १५ किमी अंतरावर असलेल्या बडनगर आश्रमात असतो. त्याने तिला आसरा देऊन सर्व घटना पोलिसांच्या कानावर घातली. त्यामुळे पीडितेला मदत मिळाली आणि पोलिसांच्या प्रयत्नांनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आलं.

दरम्यान, या प्रकरणी उज्जैन पोलिसांनी  रिक्षा चालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. नग्न अवस्थेत फिरलेल्या पीडितेला आता अनेकजण मदत करत आहेत. अशातच महाकाल पोलीस ठाण्यातील अधिकारी अजय वर्मा यांनी माणुसकीचे दर्शन दाखवले. खरं तर त्यांनी पीडित मुलीला दत्तक घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा संपूर्ण खर्च ते करणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

पीडितेसाठी पुजारी बनला 'देवदूत'पीडित तरूणीवर अत्याचार करून नराधमांनी तिला अर्धनग्न रस्त्यावर सोडले. अंगावर काटा येणारं दृश्य पाहिल्यानंतर पुजारी राहुल शर्मानं म्हटलं, "मी मुलीला पाहताच लगेच कपडे देण्यासाठी सरसावलो. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. तिला बोलता देखील येत नव्हतं आणि डोळे सुजले होते. मग मी १०० नंबरवर फोन केला. हेल्पलाईन क्रमांकावरून पोलिसांशी संवाद न झाल्यानं महाकाल पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. २० मिनिटांत पोलीस आश्रमाजवळ पोहचले." खरं तर उज्जैनच्या रस्त्यावर तरूणी नग्न अवस्थेत फिरत असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

पुजाऱ्याने सांगितली आपबीती देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीPoliceपोलिस