शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मध्य प्रदेश: माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा; पण खरी बातमी वेगळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 8:23 PM

मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवताना, लोकसभा २०२४ ची सेमी फायनल ३-२ ने जिंकली. मध्य प्रदेशातकाँग्रेसची सत्ता येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाने मोठा विजय मिळवून सत्ता कायम राखली. लक्षणीय बाब म्हणजे दारूण पराभवानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे. पण ही अफवा असल्याचे कळते. 

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले असले तरी पक्षाने ही अफवा असल्याचे म्हटले. काँग्रेस हायकमांड लवकरच नव्या अध्यक्षाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले कमलनाथ प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी भीती कायम आहे. पण अद्याप त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही.

कमलनाथ यांच्या राजीनाम्याची चर्चा! 

१७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले आणि छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या तीन राज्यांसह रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या पराभवानंतर रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले होते की, आम्हाला मध्य प्रदेशच्या मतदारांचा जनादेश मान्य आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कमलनाथ यांनीही भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि भाजपा राज्यातील जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा कमलनाथ यांनी व्यक्त केली.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३ मध्ये, भाजपाने १६३ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसElectionनिवडणूक