"काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले", अमित शाहांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 08:49 PM2023-07-30T20:49:51+5:302023-07-30T21:34:55+5:30
रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला.
नवी दिल्ली : सत्तेत ७० वर्षे असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील गरीब जनतेसाठी काहीही केले नाही, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. तसेच, काँग्रेसने कलम ३७० (जम्मू-काश्मीरमधील) हे ७० वर्षे स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले, असे अमित शाह म्हणाले. रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा एक भाग म्हणून अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशभरात गरीबांचा मसिहा म्हणून ओळखले जाते, कारण ते गरीब लोकांसाठी लोककल्याणकारी काम करत आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मध्य प्रदेशातील भाजपचे सरकार मध्य प्रदेशला 'डबल इंजिन सरकार' म्हणून देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवेल, असे अमित शाह म्हणाले.
#WATCH | Addressing 'Booth Sammelan' in Madhya Pradesh's Indore, Union Home Minister Amit Shah says, "I want to thank the people of MP from the bottom of my heart. I thank the people of MP for giving us their blessings and showering us with votes in the 2014 and 2019 elections." pic.twitter.com/WxcMbSNsjf
— ANI (@ANI) July 30, 2023
याचबरोबर, कमलनाथ यांच्या आधीच्या सरकारमध्ये अवघ्या दीड वर्षात १८,००० हून अधिक वर्ग-१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या सरकारच्या कार्यकाळात दलालांच्या मदतीने एकच उद्योग सुरू झाला, तो म्हणजे हस्तांतरण उद्योग. त्यामुळे लोकांना 'श्रीमान बंटाधार' यांची राजवट आठवली, असे अमित शाह म्हणाले. तसेच, 'श्रीमान बंटाधार' आणि 'करप्शन नाथ' यांच्या सरकारच्या काळात राज्याचा अर्थसंकल्प केवळ २३,००० कोटी रुपयांचा होता, तर शिवराज सिंह चौहान यांच्या विद्यमान सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३.१४ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला.