बागेश्वर बाबांनी स्वत:चीच 'भविष्यवाणी' केली; 'मला माहितीय, एक दिवस माझीही विकेट पडणार आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:17 AM2023-06-29T08:17:42+5:302023-06-29T08:20:05+5:30
धीरेंद्र शास्त्री यांनी ७३ समाजांच्या अध्यक्षांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे म्हटले आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांच्यासाठी येणार काळ खूप कठीण असल्याची भविष्यवाणी केली आहे. मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील खिलचीपूर उदय पॅलेसमध्ये त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. मला माहितीय की एक दिवस माझीही विकेट पडणार आहे, असे ते म्हणाले.
धीरेंद्र शास्त्री यांनी ७३ समाजांच्या अध्यक्षांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे म्हटले आहे. तुम्हा लोकांमध्ये फूट पडली तर सरकारला फायदा कसा होईल? फूट पाडण्याची निती करण्यामुळे नेत्यांना फायदा आहे. इंग्रज निघून गेले पण त्यांची बिजे उरली आहेत, असे शास्त्री म्हणाले.
सर्वांना भीती वाटतेय म्हणून मी एक गोष्ट इथे बोलत आहे. माझ्या मागे विरोधक तर लागलेलेच आहेत. मला हे देखील माहितीय की बोल्ड आऊट व्हायचे आहे. परंतू, एका धीरेंद्र कृष्ण कोणी संपवेल तोपर्यंत आम्ही घरा घरात धीरेंद्र कृष्णाची यात्रा सुरुवात करू, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
हिंदू सनातन एकतेसाठी 73 समाजाचे लोक पुढे आले आहेत हे देशाच्या इतिहासात प्रथमच होत आहे. याचे श्रेय सर्वप्रथम भारतातील राजगडला जाईल. त्यासाठी सर्व समाज एकत्र आले, तरच राष्ट्र निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतर धर्माचे लोक आपल्यातील वादांचा आनंद घेत आहेत. इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले. सध्या हिच निती हे लोक वापरत आहेत. ते तुमचा लढा भडकवताहेत, असा आरोप धीरेंद्र शास्त्री यांनी केला आहे.