Bageshwar Dham Dhirendra Shastri:बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. देशातील विविध ठिकाणी बागेश्वर बाबा यांचे दरबार भरत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्री एकांतवासात गेले होते. ५ दिवसांचा एकांतवास पूर्ण करून बागेश्वर बाबा परतले असून, भाविकांना जीवन सूत्राबाबात महत्त्वाचे मार्गदर्शन केल्याचे सांगितले जात आहे. या एकांतवासाच्या काळात बागेश्वर बाबा यांनी एक पुस्तक लिहून पूर्ण केले आहे, असे म्हटले जात आहे.
बागेश्वर बाबा एकांतवास पूर्ण केल्यानंतर आता मिशन नॉर्थ सुरू करणार आहेत. त्याआधी तो भोपाळ आणि राजगडमध्ये कथा कार्यक्रम करणार आहेत. जुलैमध्ये दिल्ली आणि ग्रेटर नोएडा येथे कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा वाढदिवस ४ जुलै रोजी दिल्ली आणि ग्रेटर नोएडा येथे साजरा करण्यात येणार आहे.
भाविकांना दिले जीवनसूत्र, म्हणाले...
बाबा बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एकांतवास संपला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, बालाजींच्या कृपेने त्यांच्या एकांतवासाच्या काळात त्यांचे पुस्तक लिहिण्याचे काम पूर्ण झाले आहे. आगामी काही कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच आयुष्यात एक सूत्र शिकलो आहे की, जेव्हा टाळ्या मिळतात, तेव्हा शिव्याही घातल्या जातात, असे बागेश्वर बाबा म्हणाले.
दरम्यान, बाबा बागेश्वर सध्या खूप चर्चेत आहेत. मोठमोठे नेतेही त्याच्या दरबारात येतात. अलीकडे पाटण्यातील त्यांच्या दरबाराचे आयोजन चर्चेत होते. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदू राष्ट्र आणि सनातन धर्माचा झेंडा उंचावण्याची गरज यावर भर दिला आहे. बंगळुरू येथेही दरबार आयोजित करून सनातन धर्मावर भर दिला.