सध्या संपूर्ण देशात मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यामधील बागेश्वर धामची चर्चा सुरू आहे. देशासह संपूर्ण जगातील लोक अर्जी लावण्यासाठी बागेश्वर धाम येथे येत असतात. आठवड्यातील मंगळवार आणि शनिवार या दोन दिवशी तर येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, गेल्या काही दिवसांत, येथे काहीतरी मागण्यासाठी येणारे काही लोकच बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बागेश्वर धाममधून बेपत्ता झालेल्यांमध्ये काही लोक मानसिक दृष्टीने आजारी आहेत. तर काही गर्दीमुळे कुटुंबापासून वेगळे झले आहेत. यात इतर राज्यांतील लोकांचाही मावेश आहे. आपल्या हरवलेल्या लोकांचा घेण्यासाठी देशाच्या इतर राज्यांतील लोकही पोलीस ठाण्याच्या आणि बागेश्वर धाम कार्यालयांच्या फेऱ्या मारत आहेत.
पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत बागेश्वर धाम येथून 21 जण बेपत्ता झाले आहेत. यातील 9 जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर 12 जण अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते. अद्याप पोलीस या लोकांपर्यंत पोहोचू शकलले नाहीत.
छत्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी अमित सांघी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही बेपत्ता असलेल्या इतर 12 जणांपर्यंत पोलीस पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित लोकांच्या कुटुंबीयांकडून तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी शोध सुरू केला आहे.