मध्य प्रदेशातील उज्जैन येथे १२ वर्षीय तरूणीवर अत्याचार करून नराधमांनी तिला नग्न अवस्थेत सोडून दिले. नराधमांनी चिमुरडीवर अत्याचार केला, तिचा छळ करून अर्धनग्न अवस्थेत सोडले. अंगावर काटा आणणारी दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. या घटनेने अवघ्या देशाच्या डोळ्यात पाणी आलं. १२ वर्षीय चिमुकलीवर नराधमांनी अत्याचार केल्यानं संपूर्ण देश हादरला. एवढंच नाही तर आरोपींची क्रूरता एवढी की पीडित तरूणी ८ किलोमीटर नग्न अवस्थेत कपड्यांच्या शोधात फिरत राहिली. पण, दुर्दैव असं की कोणीच तिला आसरा दिला नाही. या प्रकरणी उज्जैन पोलिसांनी रिक्षा चालकासह पाच आरोपींना अटक केली आहे. उज्जैनचे एसपी सचिन शर्मा यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनी एक मोठे विधान केले आहे. "माझा मुलगा खरोखरच आरोपी असेल तर त्याला जेलमध्ये न्यायला नको होते, त्याला थेट गोळ्या घालायला हव्या होत्या. माझ्या मुलाच्या जागी मी असा गुन्हा केला असता तर मी आत्महत्या केली असती आणि पोलिसांच्या हाती देखील लागलो नसतो", असे आरोपीच्या वडिलांनी सांगितले. आरोपी भरत सोनीचे वडील राजू सोनी हे एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
आरोपीच्या वडिलांनी आणखी सांगितले की, पोलिसांनी मुलाला अटक करून पोलीस ठाण्यात का नेले? त्याला गोळ्या घालायला हव्या होत्या. त्या पीडितेच्या जागी माझी मुलगी असती तर मलाही तेच हवे होते. जो कोणी असा गुन्हा करतो त्याला जगण्याचा अधिकार नाही. मुलगा माझा असो वा कोणाचाही जो गुन्हा करेल त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी. किंवा गोळ्या झाडून मारायला हवे. आम्हाला घराबाहेर जायला लाज वाटत आहे. मी आता काय करू? मला काहीच समजत नाही, मुलाच्या जागी मी असतो तर गुन्ह्याची कबुली देऊन मरून गेलो असतो. पोलिसांच्या हातीही लागलो नसतो.
पुजाऱ्याने सांगितला धक्कादायक थरारपीडित तरूणी नग्न अवस्थेत फिरत असताना मदतीला आलेल्या देवदूत पुजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी त्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण तिला बोलता देखील येत नव्हतं. त्याने तिला नाव विचारले, कुटुंबीयांबद्दल विचारले, तिला इथे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. तो तिची माहिती विचारत होता परंतु ती खूप घाबरली होती. दरम्यान, कोणीही आले तरी ती खूप घाबरायची. पोलिसांना पाहून पीडितेच्या तोंडून शब्द देखील फुटत नव्हता.