शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

भाजपाची मोठी खेळी! मुख्यमंत्रीपद नाकारलेल्या शिवराजसिंह चौहान यांना लोकसभेचं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 7:30 PM

BJP first List for Lok Sabha Elections 2024: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू असताना भाजपाने पहिली यादी जाहीर करून १९५ उमेदवारांची नावं उघड केली आहेत. दिल्लीत झालेल्या भाजपाच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शनिवारी १९५ जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून लढणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. १९५ उमेदवारांपैकी ३४ उमेदवार हे विद्यमान केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याही नावाचा समावेश आहे. याशिवाय दोन माजी मुख्यमंत्री, २८ महिला आणि ५० पेक्षा कमी वयाचे युवा ४७ उमेदवार असतील, अशी माहिती विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना देखील लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी जनार्दन मिश्रा यांना रीवा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट मिळाले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील असे बोलले जात असताना त्यांना वगळून मोहन यादव यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे आता शिवराज सिंह यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. 

कोणत्या राज्यातील किती नावे?भाजपाच्या १९५ जणांच्या यादीत उत्तर प्रदेशातील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशातील २४, गुजरात आणि राजस्थानमधील प्रत्येकी १५, केरळमधील १२, तेलंगणातील ९, आसाममधील ११, झारखंड आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी ११, दिल्लीतून ५, जम्मू-काश्मीरमधून २, उत्तराखंडमधून ३, अरुणाचल प्रदेशमधून २ आणि गोवा, त्रिपुरा, अंदमान व निकोबार आणि दमण आणि दीवमधून प्रत्येकी एकाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपाचे बडे नेते आणि त्यांचे मतदारसंघपंतप्रधान नरेंद्र मोदी - वाराणसी अमित शाह - गांधीनगर (गुजरात)शिवराज सिंह चौहान - विदिशा (मध्य प्रदेश)स्मृती इराणी - अमेठी (उत्तर प्रदेश)संरक्षण मंत्री राजनाथ सिंह - लखनौ (उत्तर प्रदेश)बन्सुरी स्वराज (सुषमा स्वराज यांच्या कन्या) - नवी दिल्लीहेमा मालिनी - मथुरा (उत्तर प्रदेश)आरोग्यमंत्री मनसुख मांडविय - पोरबंदरमधून (गुजरात)विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया - गुना (मध्य प्रदेश)किरन रिजिजू, तापीर गाओ - अरुणाचल प्रदेशपर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव - अलवर (राजस्थान)केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन - अटिंगलकेंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर - तिरुअनंतपुरमकमलजीत सेहरावत - पश्चिम दिल्लीरामवीर सिंग बिधुरी - दक्षिण दिल्लीप्रवीण खंडेलवाल - चांदनी चौक (दिल्ली)मनोज तिवारी - ईशान्य दिल्लीमाजी मुख्यमंत्री बिप्लब देब - त्रिपुराआसामचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल- दिब्रुगड

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेश