भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी ज्या मुलीला The Kerala Story दाखवला; तीच मुस्लिम तरुणासोबत पळाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:27 PM2023-06-06T12:27:46+5:302023-06-06T12:29:19+5:30

भोपाळमध्ये काही दिवसापूर्वीच खासदार पज्ञा सिंह यांनी मुलींना 'द केरळा स्टोरी' हा चित्रपट दाखवला होता.

bjp mp pragya singh showed the kerala story girl ran away with muslim lover | भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी ज्या मुलीला The Kerala Story दाखवला; तीच मुस्लिम तरुणासोबत पळाली!

भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी ज्या मुलीला The Kerala Story दाखवला; तीच मुस्लिम तरुणासोबत पळाली!

googlenewsNext

गेल्या काही दिवसापासून 'The Kerala Story या चित्रपटाची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटावरुन आरोप-प्रत्यारोही झाले. भाजपने या चित्रपटाला उघडपणे पाठिंबा दिला.  देशभरात भाजप नेत्यांनी मुलींना हा चित्रपट दाखवला आणि यातून शिकण्यास सांगितले. भाजप खासदार प्रज्ञा सिंह यांनीही हा चित्रपट अनेकांना दाखवला. आता या संदर्भात एक माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये खासदार प्रक्षा सिंह यांनी ज्या मुलीला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट दाखवला. आता तिच मुलगी मुस्लिम प्रियकरासह पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलीस ॲक्शनमोडमध्ये; सोमवारी रात्री ब्रिजभूषण सिंहांच्या निवासस्थानी, १५ जणांची चौकशी

खासदार प्रज्ञा सिंह यांनी या मुलीला चित्रपट दाखवल्यानंतर बॉयफ्रेंड युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या तरुणीचे ३० मे रोजी लग्न होणार होते, मात्र त्यापूर्वीच ती प्रियकरासह घरातून पळून गेली. तिने आपल्यासोबत काही दागिने आणि रोख रक्कमही नेल्याचे सांगण्यात आले आहे. आता मुलीच्या कुटुंबीयांनी भोपाळच्या कमला नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

युसूफने आपल्या मुलीला जाळ्यात अडकवून तिला घेऊन पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. युसूफनेही आपल्या मुलीच्या नावावर कर्ज घेऊन तिला ईएमआय भरण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मात्र, आपण स्वत:च्या इच्छेने पळून गेल्याचे मुलीने म्हटले आहे. युसूफ विरोधात पोलिसांत अगोदरही गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.

'The Kerala Story' या चित्रपटात मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लाममध्ये कसे धर्मांतरित केले जाते हे दाखवण्यात आले आहे. यात काही मुलींची स्टोरी दाखवण्यात आली आहे,  ज्यांना परदेशात नेले जाते आणि नंतर त्या दहशतवादी संघटनेचा भाग बनतात. या चित्रपटावरून देशभरात बराच गदारोळ झाला होता.

Web Title: bjp mp pragya singh showed the kerala story girl ran away with muslim lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.