निवडणूक आयोगाने आज मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे भाजपानेमध्य प्रदेशसह राजस्थानमधील काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मध्ये प्रदेशमध्ये आज ५७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशमध्ये भाजपाची ही चौथी यादी आहे. शिवराज सिंह चौहान यांना बुधनीतून तिकीट देण्यात आले आहे. राज्याचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतियातून उमेदवारी दिली आहे. गोपाल भार्गव रेहलीमधून, विश्वास सारंग नरेलामधून आणि तुलसीराम सिलावत सावेरमधून निवडणूक लढवणार आहेत.
याचबरोबर भाजपाने राजस्थानमध्ये आपल्या सात खासदारांना तिकीट जाहीर केले आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील पक्षाने मंत्र्यांसह सात खासदारांना रिंगणात उतरविले होते. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक माजी आमदारांना स्थान देण्यात आले आहे. या यादीत विधानसभेसाठी खासदार रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीपूर्वीच भाजप आपल्या दिग्गज खासदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवू शकते, अशी चर्चा होती.