भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 40 किलोमीटर अंतरावर एका काळविटाच्या शिकारीने खळबळ उडाली आहे. घटना बारखेडा येथे घडली असून, रात्रीच्या अंधारात काळविटाची शिकार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी दुपारी वनविभागाच्या पथकाने काळविटाचा मृतदेह पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आता 3 दिवसांनंतर अहवाल आल्यानंतर हरणाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
मानेजवळ एक जखमकाळविटाच्या मानेजवळ एक जखम असून, शरीरावर इतर कोणतीही दुखापत झालेली नाही. शिकाऱ्यांनी काळवीटाला मारल्याचा संशय वनविभागाला आहे. पण, वनविभागाच्या भीतीने मृतदेह घेऊन जाऊ शकले नाहीत. दरम्यान, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच काळवीटाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला नाही याबाबत माहिती देताना राज्याच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टर संगीता धमिजा यांनी सांगितले की, काळविटाला वनविभागाच्या पथकाने शवविच्छेदनासाठी आणले होते. आम्ही शवविच्छेदन केले असून, त्याचा अहवाल लवकरच वनविभागाला दिला जाईल. काळविटाच्या शरीरावर इतर कोणतीही जखम दिसत नाही, त्यामुळे त्याच्यावर वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे वाटत नाही.