भोपाळ – राज्यात मोठ्या प्रमाणात गायी रस्त्यावर आहेत. त्या सर्व गायींना गोशाळेत नेण्याचं काम करण्याचे मिशन हाती घेतले पाहिजे. गोशाळा युद्धपातळीवर तयार करा असा आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासकीय बैठकीत अधिकाऱ्यांना दिला आहे.
मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, मोठ्या प्रमाणात गायी रस्त्यावर आहेत, त्यांना गो आश्रयस्थानात नेण्याचे काम मिशन मोडमध्ये केले पाहिजे. गोशाळे युद्धपातळीवर तयार करा. तसेच तात्पुरत्या स्वरुपात गायी ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी असं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री चौहान गो आश्रयस्थानांचे बांधकाम आणि राज्यातील गोवंशाच्या स्थितीचा आढावा घेत होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वनविभागाच्या अधिकार्यांसह मिळून त्या जागेवर मार्किंग करा. गोशाळेचे बांधकाम व गायी ठेवण्याची व्यवस्था याबाबत नियोजन करून कामाला सुरुवात करा असे आदेशच मुख्य सचिव इक्बाल सिंग बैंस आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले.