मुख्यमंत्री 'लाडली बहना' योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 98.5 टक्के रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 08:16 PM2023-06-14T20:16:54+5:302023-06-14T20:25:58+5:30

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 10 जून रोजी महिलांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित केली आहे.

CM shivraj singh chauhan, 98.5 percent amount deposited in the accounts of beneficiaries of Chief Minister Ladli Bahna Yojana | मुख्यमंत्री 'लाडली बहना' योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 98.5 टक्के रक्कम जमा

मुख्यमंत्री 'लाडली बहना' योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 98.5 टक्के रक्कम जमा

googlenewsNext

भोपाळ- मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 10 जून रोजी "मुख्यमंत्री लाडली बहना'' योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात 1209 कोटी 64 लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित केली आहे. 98.5% रक्कम हस्तांतरित झाली असून, उर्वरित 1.5 टक्के प्रकरणांमध्ये अडचणी आल्या आहेत. नेमकी समस्या समजल्यानंतर येत्या आठवडाभरात दुरुस्तीची कार्यवाही केली जाईल आणि 25 जूनपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.

महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या आरोग्य आणि पोषण पातळीत सातत्याने सुधारणा व्हावी आणि कौटुंबिक निर्णयात त्यांची भूमिका मजबूत व्हावी यासाठी राज्यात मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1000 रुपये जमा केले जातील.

याबाबत मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, महिलांना दरमहा मिळणारी 1000 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात राज्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन 1000 वरुन सुरुवातीला 1250 रुपये, नंतर 1500, 2000, 2250, 2500, 2750 आणि शेवटी 3 हजार रुपये केले जातील

योजनेसाठी विवाहित पात्र महिलेचे किमान वय 23 वरुन 21 वर्षे करण्यात आले आहे. सध्या 23-60 वयोगटातील विवाहित महिला या योजनेस पात्र आहेत. 60 वर्षांवरील महिलेला सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना किंवा इतर कोणत्याही योजनेतून दरमहा 1000 रुपयांपेक्षा कमी मिळत असल्यास, इतर योजनेद्वारे एक हजार रुपये दिले जातील.

मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, ज्या कुटुंबात ट्रॅक्टर असतील, अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळेल. ट्रॅक्टरला चारचाकी वाहनाच्या श्रेणीत ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे या कुटुंबातील बहिणींनाही दरमहा एक हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय, महिला सैन्यदेखील तयार केले जाईळ. मोठ्या गावांमध्ये 21 आणि छोट्या गावात 11 सदस्यांचा गट असेल. अन्याय आणि शोषणाविरुद्ध महिलांचा हा गट लढेल. हा गट महिलांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करेल.

Web Title: CM shivraj singh chauhan, 98.5 percent amount deposited in the accounts of beneficiaries of Chief Minister Ladli Bahna Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.