शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश यादवांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 18:22 IST

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला.

Congress vs SP: केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी (india alliance) स्थापन केली आहे. पण, अजूनही विरोधकांना एकजूट होता आले नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव ( Akhilesh Yadav) सातत्याने काँग्रेसवर (congress) टीका करत आहेत. रविवारी मध्य प्रदेशातील टिकमगड येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अखिलेश यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला कपटी पार्टी म्हणत, नागरिकांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले.

काँग्रेसची मते भाजपला गेलीयूपीचे माजी मुख्यमंत्री यावेळी म्हणतात, काँग्रेस पक्षाबाबत नेहमी सावधगिरी बाळगा. ते आमचा विश्वासघात करू शकतात, मग तुम्ही त्यांच्यासाठी कोणत आहात. अशा लोकांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काँग्रेसनेही जातीवर आधारित जनगणनेची मागणी सुरू केली आहे. काँग्रेसला हे हवंय, कारण त्यांची सर्व मते भाजपला गेली आहेत. ही मते परत मिळविण्यासाठी काँग्रेस जात जनगणनेची मागणी करत आहे, अशी टीका अखिलेश यादवांनी यावेळी केली.

काँग्रेस विश्वासघात करणारमध्य प्रदेशात जागावाटपावरुन मतभेद निर्माण झाल्यापासून अखिलेश यादव काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. अखिलेश यांनी एका दिवसापूर्वी, म्हणजेच शनिवारी मध्य प्रदेशातील छतरपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस भाजपची भाषा बोलत असल्याची टीका केली होती. सपा उमेदवारांच्या घोडेबाजाराबद्दल विचारले असता अखिलेश म्हणाले की, यावरुनच काँग्रेसचे इरादे दिसून येतात. एमपीच्या लोकांनी पाहिलंय, आघाडीचा विश्वासघात कोणी केला, तर तो पक्ष काँग्रेस आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

काँग्रेस-सपा 'India' आघाडीतविशेष म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीत काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षासह दोन डझनहून अधिक विरोधी पक्षांचा समावेश आहे. भाजपला केंद्रातील सत्तेतून बेदखल करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी ही आघाडी स्थापन केली आहे. पण, लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले आहेत. या मतभेदाची सुरुवात मध्य प्रदेश निवडणुकीपासून झाली, आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकPolice Stationपोलीस ठाणेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी