धक्कादायक! मैत्रिणीला जेवायला बोलावलं अन्...; 50 लाखांचा ऐवज लंपास; 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:26 AM2023-06-02T11:26:52+5:302023-06-02T11:34:19+5:30
एका महिलेने आपल्याच मैत्रिणीची फसवणूक केली. महिलेने मैत्रिणीला आपल्या घरी बसवलं आणि तिच्या घरातून 50 लाख चोरल्याची घटना घडली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्याच मैत्रिणीची फसवणूक केली. महिलेने मैत्रिणीला आपल्या घरी बसवलं आणि तिच्या घरातून 50 लाख चोरल्याची घटना घडली आहे. पीडित कुटुंबातील व्यक्तीने कपाट उघडले असता लॉकर गायब असल्याचं लक्षात आल्याने ही घटना उघडकीस आली. लॉकर गायब असल्याचे पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. एफआयआर दाखल करण्यासाठी त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठलं.
तीन-चार दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी महिलेचा मैत्रिण, तिचा पती आणि त्यांच्या मुलीला अटक केली आहे. आरोपी कुटुंब लोकांशी मैत्री करून त्यांच्या घरातून चोरी करतात. पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांना खूप शोधाशोध करावी लागली. पोलिसांनी 45 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तर दुसरीकडे 25 हून अधिक जणांची चौकशी केली. यानंतर अखेर पोलिसांनी संशयावरून महिलेला ताब्यात घेतलं. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होऊ शकला.
भोपाळचे पोलिस आयुक्त हरिनारायण मिश्रा यांनी सांगितले की, रामसिंग परमार यांचा मुलगा 31 वर्षीय जितेंद्र सिंह कोलार रोडच्या राजहर्ष कॉलनीत राहतो. त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांचे मूळ घर छतरपूरच्या हरपालपूर येथे आहे. 25 मे रोजी दिल्लीला गेल्याचे जितेंद्र यांनी कोलार पोलिसांना सांगितले आहे. त्यावेळी घरात पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा आणि भाची होते. दरम्यान सर्व काही ठीक होते. पण, 29 मे रोजी परत आलो आणि कपाट उघडताच मी हैराण झालो. आमच्या कपाटात ठेवलेले तिजोरीचे लॉकर गायब होते. त्या लॉकरमध्ये दागिने आणि रोख रक्कम होती. त्याची किंमत सुमारे 50 लाख होती.
घरात दुसरे कोणी आले नाही, असे महिलेने सांगितले. 26 मे रोजी सकाळी पत्नी रागिणी तिची मैत्रिण रेखाच्या घरी गेली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी आली. जितेंद्रने पोलिसांना सांगितले की, घरात सर्वत्र कुलूप लावण्यात आले होते. सर्व कुलूप सुरक्षित आहेत. त्यामुळे कुलूपांच्या चाव्या मिळवून कोणीतरी ही घटना घडवून आणल्याचे दिसते. यानंतर पोलिसांनी रूपेश राय (47), त्याची पत्नी रेखा (40) आणि अल्पवयीन मुलीला चौकशीनंतर अटक केली. आरोपीने सांगितले की, जितेंद्र बाहेर गेल्याचे समजताच रागिणीला घरी बोलावले. त्यानंतर ती रागिणीला सांगून निघून गेली की तिच्यासाठी नाश्ता आणते. ती अर्ध्या तासात परत येईल. रेखाने रागिणीच्या पर्समधून घराच्या चाव्या काढून कपाटातून तिजोरी बाहेर काढली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.