भोपाळ - देशातील ५ राज्यांत विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून मध्य प्रदेशातकाँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढत होणार असल्याचे दिसून येते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रचारासाठी मैदानात उतरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनीही येथील राजकीय लढाई प्रतिष्ठेची केली आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वात निवडणूका लढल्या जात आहेत. तर, काँग्रेसनेही कलमनाथ यांच्या नेतृत्त्वात रणशिंग फुंकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधींनी मध्य प्रदेशातील जनेतला मोठं आश्वासन दिलं आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यास नागरिकांना मोठ्या सवलतील मिळणार आहेत. त्यासंदर्भात स्वत: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला आश्वासन दिले. त्यानुसार, १० मुद्द्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळणार असल्याची गॅरंटी देण्यात आली आहे. ५०० रुपयांत गॅस सिलेंडर आणि महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, १ ली ते १२ वी पर्यंत मोफत शिक्षण, १०० युनिट वीज मोफत देण्याचीही घोषणा काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसने दिली गॅरंटी
१ - महिलासाठी १५०० रूपये महीने२ - ५०० रुपयांत गॅस सिलेंडर३ - १०० यूनिट वीज बिल माफ, २०० यूनिट का बिल हाफ४ - १ ते १२ वी पर्यंतच शिक्षण मोफत ५ - जुनी पेंशन योजना लागू६ - शेतीसाठी ५ हॉर्स पावर वीज मोफत ७ - ओबीसींना २७% आरक्षण८ - पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागासाठी समान आर्थिक लाभ९ - जातनिहाय जनगणना होणार १० - शेतकऱ्यांवरील गुन्हे वापस घेणार