शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

IAS ची तयारी करणाऱ्या मुलाचा मृत्यू; पालकांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, 7 जणांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 8:06 PM

डॉक्टरांनी 24 वर्षीय मुलाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर पालकांनी मोठा निर्णय घेतला.

MP News: मध्यप्रदेशच्या खरगोन, कासरवाड तालुक्यातील सांगवी गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ग्रॅज्युएशननंतर UPSC पास होऊन IAS होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या 24 वर्षीय विशाल मोयदे नावाच्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला. एकुलत्या एक पोराच्या मृत्यूने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगी मोयदे कुटुंबाने स्वतःला सावरले आणि असा निर्णय घेतला, ज्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएडचा पेपर सोडवत असताना विशालला अचानक डोकेदुखी झाली आणि तो बेशुद्ध झाला. यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. समस्या गंभीर असल्यामुळे पुढे त्याला इंदूर आणि तेथून गुजरातमधील झायडस रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशालच्या मेंदूत शिरेचा गुच्छ तयार झाला होता. डॉक्टरांनी विशालला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. 

विशालच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. यानंतर आई सुशीलाबाई आणि वडील अंबाराम मोयदे यांनी आपल्या मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. विशालच्या पालकांच्या इच्छेनुसार वडोदरा येथे सुपर कॉरिडॉर तयार करण्यात आला. डॉक्टरांच्या पथकाने विशालच्या शरीरातून सात अवयव काढले. यकृत, हृदय, लहान आतडे, दोन्ही फुफ्फुसे आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. किडनी, झायडस हॉस्पिटल अहमदाबाद, फुफ्फुस, केडी हॉस्पिटल अहमदाबाद, हार्ट, रिलायन्स हॉस्पिटल मुंबई, लहान आतडे एमजीएम हॉस्पिटल चेन्नई आणि यकृत किरण हॉस्पिटल सुरत येथे पाठवण्यात आले.

आई-वडिलांनी केली अवयवांची पूजा वडोदरा येथे त्यांच्या मुलाच्या अवयवदानाच्या वेळी विशालची आई सुशीला आणि वडील अंबाराम यांनी मुलाच्या अवयवांची पूजा केली. विशालचे वडील अंबाराम म्हणाले की, मला जगाला हा संदेश द्यायचा आहे की, प्रत्येक मानवाने असे काम केले पाहिजे. आपले मानवी अवयव एखाद्या गरजू व्यक्तीला उपयोगी पडत असतील, एखाद्याला नवीन जीवन मिळू शकत असेल, तर तो खूप मोठा आशीर्वाद आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशOrgan donationअवयव दानupscकेंद्रीय लोकसेवा आयोग