मध्य प्रदेशमधीलभाजपाच्या एका आमदारांना सध्या मद्यपान करून फोन करणाऱ्या लोकांनी त्रस्त करून सोडले आहे. या प्रकारामुळे त्रस्त असलेल्या आमदार चिंतामणी मालवीय यांनी भर मंचावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संध्याकाळच्या वेळी मद्यपान करून फोन करू नका, सकाळी फोन करा, मी सकाळी बोलेने, पुन्हा असं काही घडलं, तर मी फोन उचलणार नाही, असेही या आमदारांनी सांगितले.
रतलाम जिल्ह्यातील अलोट विधानसभा मततदारसंघातील भाजपा आमदार चिंतामणी मालवीय मद्यपान करून फोन करणाऱ्यांमुळे त्रस्त आहेत. जेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली तेव्हा उपस्थितांना हसू आवरता आले नाही. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मित्रांनो संध्याकाळी मद्यपान करून फोन करू नका. सकाळी फोन करा, मी तुमच्याशी बोलेन. मात्र हे असंच सुरू राहिलं तर मी फोन उचलणं बंद करेन. चिंतामणी मालवीय आधी उज्जैन येथील खासदार होते. दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून पहिल्यांदाच आमदार बनले आहेत.
त्यांनी मांडलेल्या व्यथेमुळे असं वाटत आहे की, त्यांना लोक मद्यपान करून फोन लावतात. त्यामुळे ते त्रस्त झालेले आहेत. तसेच किमान संध्याकाळच्या वेळी तरी मद्यपान करून फोन करू नका, अशी विनवणी त्यांनी केली आहे. तर आमदार महोदयांचा हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.