बंगळुरुतील विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. खराब हवामानामुळे विमान उतरविण्यात आल्याचे भोपाळ पोलिसांनी सांगितले आहे.
विरोधी पक्षांच्या एकजुटीची दुसरी मोठी बैठक आज बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्ष सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस होती. या बैठकीनंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी विमानाने दिल्लीला परतत होते.
दोन्ही नेते भोपाळ विमानतळाच्या व्हीआयपी लाउंजमध्ये हवामान सुधारण्याची वाट पाहत आहेत. इंडिगोच्या विमानाने रात्री 9.30 वाजता सोनिया आणि राहुल गांधी दिल्लीला रवाना होतील, असे समजते आहे.