तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:37 AM2023-07-21T11:37:12+5:302023-07-21T11:38:03+5:30

बटाट्याच्या भाजीवरून विद्यार्थी आणि आयटीआय वसतिगृहाचे प्राचार्य एकमेकांशी भिडले. त्यांच्यात वाद झाला.

fight between principal and students over food in morena | तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी

तुफान राडा! 'बटाट्याच्या भाजी'वरून विद्यार्थी अन् प्राचार्य भिडले; झाली तुंबळ हाणामारी

googlenewsNext

मध्य प्रदेशातील मुरैना शहरात बटाट्याच्या भाजीवरून विद्यार्थी आणि आयटीआय वसतिगृहाचे प्राचार्य एकमेकांशी भिडले. त्यांच्यात वाद झाला. या घटनेची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर तहसीलदारांनी घटनास्थळी जाऊन प्रकरण मिटवले. याप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

हे संपूर्ण प्रकरण मुरैना येथील राष्ट्रीय महामार्ग 44 जवळील जडेरुआ भागात असलेल्या आयटीआय वसतिगृहाशी संबंधित आहे. आयटीआय वसतिगृहातील मोहकम हा विद्यार्थी त्याच्या इतर सहकारी विद्यार्थ्यांसह वसतिगृहाचे प्राचार्य जीएस सोळंकी यांच्याकडे पोहोचला होता. येथे मोहकम आणि इतर विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांकडे जेवणासाठी फक्त बटाट्याची भाजी मिळत असल्याची तक्रार केली. मेनूनुसार जेवण मिळत नाही असं म्हटलं.

अर्जही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना दिला, मात्र मुख्याध्यापकांनी अर्ज फेकला. त्यामुळे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर प्राचार्यांनी मोहकम या विद्यार्थ्याचा हात पकडून त्याला ओढले आणि त्यानंतर त्यांच्यात वाद झाला घटनास्थळी उपस्थित इतर विद्यार्थ्यांनी दोघांना कसेतरी वेगळे केले. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी मुरैना जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांच्याकडे तक्रार केली, त्यानंतर तहसीलदार कुलदीप दुबे यांनी वसतिगृह गाठून येथील समस्या सोडवली.

तहसीलदार कुलदीप दुबे यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, वसतिगृहात जेवणाचा मेन्यू तयार होत नसल्याची तक्रार होती. जागेवरच मेनूनुसार जेवण बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच वसतिगृहात अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे स्वच्छतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे, टीम आपला तपास अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: fight between principal and students over food in morena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.