हरदा / भोपाळ : मध्य प्रदेशच्या हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू, तर २०० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना भोपाळसह इतर ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे इमारतीचे खांबही उखडून फेकले गेले, तर आगीने तासभर फटाक्यांचे आवाज आले.
हरदा शहराच्या मगरधा मार्गावर फटाक्यांच्या कारखान्यात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या अनेक घरांमध्ये बारूद ठेवलेला होता. स्फोटामुळे बारूद देखील पेटल्याने आगीचा मोठा भडका उडाला. त्यामुळे जवळपास ६० हून अधिक घरांमध्ये आग लागली. स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्याने कामगारांच्या शरीराचे अवयव अक्षरशः इकडे तिकडे विखुरलेले होते. घरातील वस्तू, वाहनेही हवेत उडाली. आगीचे लोट कित्येक किलोमीटरवरून दिसत होते. आगीतून वाचण्यासाठी लोक सैरावैरा धावत होते.
राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना दु:खnआगीच्या घटनेची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.nपंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखांची तर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रत्येकी ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली.nतसेच जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोक मानवी अवयव गोळा करत होतेआगीनंतर दुर्घटनास्थळी मन सुन्न करणारे दृश्य होेते. विखुरलेले मृतदेह, नुकसान झालेली घरे व आजूबाजूला पडलेला ढिगारा. राज्यमंत्री राव उदय प्रताप सिंह यांनी हरदा येथे जाताना हेलिकॉप्टरमधून काढलेल्या व्हिडिओत कारखाना ढिगाऱ्यात रूपांतरित झाल्याचे दिसून आले. स्फोटांचा आवाज २० ते २५ किमी दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटांची तीव्रता एवढी प्रचंड होती की, पीडितांच्या शरीराचे अवयव घटनास्थळापासून खूप दूरवर जाऊन पडले होते. लोक मानवी अवशेष गोळा करत असल्याचे काही व्हिडीओंत दिसते.