शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

गुनामध्ये भीषण अपघात, डंपरवर धडकून बसने घेतला पेट, १३ जणांचा जळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 9:09 AM

Bus Accident In Guna: मध्य प्रदेशमधील गुना येथे भीषण अपघात घडला आहे. येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन बस उलटली. त्यानंतर बसने पेट घेतल्याने त्यात जळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशमधील गुना येथे भीषण अपघात घडला आहे. येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन बस उलटली. त्यानंतर बसने पेट घेतल्याने त्यात जळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर इतर २५ प्रवाशांना बसच्या काचा फोडून बाहेर पडत कसाबसा आपला जीव वाचवला.

मिळालेल्या माहितीनुसार बस क्रमांक एमपी ०८ पी ०१९९ ही बस २७ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० च्या सुमारास गुना येथून आरोनकडे निघाली होती. सुमारे २५ मिनिटांनंतर बजरंगगड ठाण्यापासून ५ किमी आधी या बसची टक्क एका भरधाव डंपरसोबत झाली. ही धडक एवढी भयंकर होती की त्यात टक्कर होताच बस रस्त्यावर पलटी झाली. तसेच बसला आग लागली. आत अडकलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. लोक काही समजण्यापूर्वीच आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार सिकरवार ट्रॅव्हल्सची ही बस १७ फेब्रुवारा २०२२ पासून अनफिट होती. तरीही ती चालवली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या बसला विमाही उतरवलेला नव्हता. या प्रकरणी आरटीओची बेफिकीरी समोर आली आहे. दुर्घटनेनंतर पोलिसांनी ५ मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे. इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. बस जळाल्याने मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांना प्रत्येकी ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. असे अपघात पुन्हा होऊ नयेत म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश