Harda Blast: मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात मंगळवारी(दि.6) एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की, संपूर्ण परिसर हादरुन गेला. स्फोटाचा प्रभाव 40 किलोमीटर दूरपर्यंत जाणवला. प्रभाव इतका भीषण होता की, आवाजामुळे अनेकलोक आपली वाहने सोडून पळू लागले. यामुळे अनेक घरे कोसळली, सरकारी रुग्णालयाच्या काचा फुटल्या, आगीमुळे संपूर्ण परिसर धुरात बुडाला.
व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केलीया अपघाताबाबत एका स्थानिक व्यक्तीने मीडियाला सांगितले की, तो सकाळी 11.30 वाजता फटाका कारखान्यापासून 800 मीटर अंतरावर असलेल्या घंटाघर मार्केटमध्ये उभा होता. यावेळी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून काही लोक मदतीसाठी कारखान्याकडे धावले, मात्र 11.40 वाजता कारखान्यात मोठा स्फोट झाला आणि घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाला. मदतीसाठी गेलेले लोकही मागे पळून आले. स्फोटामुळे घंटाघर बाजारपेठ हादरली आणि व्यापारी आपली दुकाने बंद करुन पळू लागले.
टिन शेड तुकडे 500 मीटर अंतरावर पडलेस्फोटामुळे छोटे-मोठे दगड आणि लोखंडी पत्र्यांचे शेड कारखान्यापासून 500 मीटर दूरपर्यंत उडून पडले. यामुळे काहींचा मृत्यू झाला, तर अनकजण जखमी झाले. घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर असलेली घरेही स्फोटाच्या प्रभावाखाली आली. सुमारे तासभर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सुरूच होते. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत जाणवला, 40 किलोमीटर अंतरावर असलेला परिसरही हादरला. घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या काचाही फुटल्या. यासोबतच आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले आहे.