अरेरे! हॉस्पिटलमध्ये कलेक्टरने 'ब्लड' ऐवजी ऐकलं 'बुलेट'; रुग्णाच्या नातेवाईकाला खडसावलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:53 AM2024-01-31T10:53:55+5:302024-01-31T10:57:01+5:30
मॅटरनिटी वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कलेक्टर साहेबांना रक्तासाठी (ब्लड) विनंती केली. परंतु रुग्णाचा नातेवाईक बुलेट मागत असल्याचं कलेक्टर साहेबांना वाटलं.
मध्य प्रदेशातील जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी गुनाचे कलेक्टर मॅटरनिटी वॉर्डमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना अनेक समस्या दिसल्या. मॅटरनिटी वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कलेक्टर साहेबांना रक्तासाठी (ब्लड) विनंती केली. परंतु रुग्णाचा नातेवाईक बुलेट मागत असल्याचं कलेक्टर साहेबांना वाटलं. त्यांनी 'ब्लड' ऐवजी 'बुलेट' असं ऐकलं.
कलेक्टरनी रुग्णाच्या नातेवाईकाला खडसावलं आणि म्हणाले की, "ही बुलेट मागायची जागा आहे का?" पण नंतर कलेक्टर अमनबीर सिंह बैंस यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी सिव्हिल सर्जनला रुग्णाला मदत करून करण्याचे निर्देश दिले. महिला डॉक्टरांवरही लाच मागितल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
जिल्हा रुग्णालयात अचानक तपासणीसाठी आलेल्या गुना कलेक्टरचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. जिथे त्यांना रुग्णालयाच्या आवारात गुरं दिसली. कलेक्टर साहेबांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गुरांना परिसरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
जिल्हा रुग्णालयात अशा पद्धतीने गुरं फिरत असल्याने कलेक्टर नाराज झाले. जिल्हाधिकारी अमनबीर सिंह बैंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयातील तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्या, त्या दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला डॉक्टरांवर लाच मागितल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.