सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. हास्यास्पद तितक्याच संतापजनक घटना समोर येत असतात. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना सर्वांना थक्क करुन जातात. अशीच एक संतापजनक घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली. येथे वृद्धाश्रमात जाण्यासाठी व्यग्र असलेल्या व्यक्तीने जे केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आपले पालक वर्षभरापूर्वी मरण पावले असल्याचे माहिती असताना तो अंत्यदर्शनासाठी आला नाही. पण, आता गरज भासताच त्याने वृद्धाश्रमाचा दरवाजा ठोठावला.
दरम्यान, भोपाळच्या आसरा वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापक राधा चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वृद्धाश्रमात दरवर्षी पितृ पक्षाच्या काळात ही परिस्थिती पाहायला मिळते. अनेकजण आपल्या पालकांची आठवण सांगत इथे येत असतात. या १५ दिवसांत लोक मोठ्या थाटामाटात येतात आणि त्यांच्या आई-वडिलांची विचारपूस करतात. त्यांच्या आई-वडिलांची एखादी आठवण असल्यास द्यावी अशी मागणी ते करत असतात.
अंत्यसंस्कारासाठी गैरहजर पण... मृतांच्या आठवणी, निशाणी किंवा एखादी वस्तू त्यांच्या वारसाला दिली जाते. संस्थेतर्फे संबंधित मृत व्यक्तींच्या घरच्यांना तशी कल्पना दिली जाते. मात्र, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तेच वंशज आहेत जे आपल्या आई-वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी देखील आले नव्हते. त्यावेळी आश्रमातर्फे ज्येष्ठांचे अंतिम संस्कार करण्यात आले. आता इतक्या वर्षांनंतर लोकांना आपल्या आई-वडिलांची आठवण आली आणि ते हे आठवणी सांगत आहेत. एक वर्षापूर्वी एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. आता त्यांचा मुलगा इथे चप्पल मागायला आला आहे, असेही राधा चौबे यांनी सांगितले.
माझे वडील स्वप्नात येतात... ते माझ्याकडे चप्पल मागतात, अशी मागणी करत एक व्यक्ती आश्रमात आला. अनेक जण आजारपणाची किंवा मृत्यूची माहिती मिळाल्यावर केवळ अंत्यसंस्कारासाठी पैसे खर्च करावे लागतील म्हणून आपल्या वडिलधाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. किंबहुना त्यांना भीती वाटते की मृत आत्मा त्यांना त्रास देऊ शकतो, असेही वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.