प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 07:54 PM2024-09-20T19:54:54+5:302024-09-20T19:54:58+5:30
प्रेयसीने केलेली मागणी पूर्ण करू न शकल्याने एका विवाहित व्यक्तीने मृत्यूला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.
प्रेयसीने केलेली मागणी पूर्ण करू न शकल्याने एका विवाहित व्यक्तीने मृत्यूला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्याने आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ पत्नीला पाठवून जीवन संपवले. मग पत्नीने माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली, पती गंभीर अवस्थेत असल्याचे पाहून तिला धक्का बसला. मग तिने सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या पतीला जवळच्या इस्पितळात नेले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. रामचरण नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तो फर्निचर कंपनीत काम करत असे. टोकाचे पाऊल उचलताना रामचरणने व्हिडीओ काढून पत्नीला शेअर केला. त्याने एका महिलेवर आरोप करताना म्हटले की, पिंकी ही महिला मागील काही दिवसांपासून पैशांसाठी मला ब्लॅकमेल करत आहे. मी अनेकदा तिला पैसे दिले. पण, दिवसेंदिवस तिची मागणी वाढत गेल्याने मी वैतागलो. ती आजही माझ्याकडे सहा लाख रुपयांची मागणी करत आहे.
पत्नीला व्हिडीओ शेअर करताना संबंधित व्यक्तीने आणखी सांगितले की, मी विष प्राशन केले आहे, मला काही झाले तर हा ऑडिओ आणि व्हिडीओ व्हायरल करा जेणेकरून दोषींना शिक्षा होईल. यानंतर रामचरणची पत्नी चमन हिने लगेच संबंधित ठिकाणी पोहोचून पतीला जिल्हा रुग्णालयात नेले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर रामचरणवर उपचार करत आहेत मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
...अन् रामचरणने संपवले जीवन
रामचरणची पत्नी चमनने सांगितले की, रामचरण सकाळी कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. यानंतर रात्री मित्राने फोनवर रामचरणने विष प्राशन केल्याचे सांगितले. मग त्याच्या मोबाइलमधील व्हिडीओ आणि ऑडिओ पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याने बनवलेला व्हिडीओ आणि ऑडिओ पोलिसांच्या हवाली केला. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, रामचरणने व्हिडीओमध्ये ज्या मुलीचे नाव सांगितले आहे तिचा शोध सुरू आहे.
सुसाईड नोटमध्ये रामचरण पत्नी चमन जाटव हिला पिंकी दास ही महिला सतत त्रास देत असल्याचे सांगतो. तिने मला ६ लाख रुपये दे नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार राहा, अशी धमकी दिली आहे. ती मला वारंवार कॉल करते आणि जेव्हा मी फोन उचलत नाही, तेव्हा ती मला मेसेज पाठवते, जे माझ्या फोनच्या मेसेज बॉक्समध्ये असतात. यावर माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. तिचे रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये आहे. पिंकी, तिची आई आणि भावाने मिळून अनेकांना उद्ध्वस्त केले आहे आणि भविष्यातही ते करत राहतील. म्हणूनच मी हा निर्णय घेतला.