भारत जागतिक पर्यटनाचे केंद्र बनणार! केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री शेखावत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 11:57 AM2024-08-31T11:57:03+5:302024-08-31T12:00:42+5:30

IATO, Madhya Pradesh Tourism: भारतातील पर्यटन जागतिक स्तरावर नेण्यात मध्य प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावेल- राज्यमंत्री लोधी

India to become hub of global tourism said Union Tourism, Culture Minister Gajendra Singh Shekhawat | भारत जागतिक पर्यटनाचे केंद्र बनणार! केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री शेखावत यांची ग्वाही

भारत जागतिक पर्यटनाचे केंद्र बनणार! केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री शेखावत यांची ग्वाही

IATO Madhya Pradesh Tourism: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक गरजेनुसार देशात नवीन पर्यटन स्थळे विकसित केली जात आहेत. देशातील पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये आणि आकर्षण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचे आर्थिक योगदान वाढवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. २०४७ मध्ये भारताला जगातील आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यात पर्यटन क्षेत्र प्रमुख भूमिका बजावेल. भारताचा इतिहास, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि ज्ञानाची विविधता जाणून घेण्याचे आकर्षण जगामध्ये वाढले आहे. त्यातून पर्यटनाच्या नव्या संधीची दारे खुली होत आहेत. आपण सर्वांनी मिळून या संधीचा लाभ घेतला पाहिजे आणि भारताला जागतिक पर्यटनाचे केंद्र बनवण्यात योगदान दिले पाहिजे, असा मोलाचा सल्ला केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिला. IATO च्या ३९व्या अधिवेशनात मॅन्युअल अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. हे अधिवेशन तीन दिवसीय असून त्याची आज सुरुवात झाली.

IATO (Indian Association of Tour Operators) च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान IATO मॅन्युअलचे प्रकाशन करण्यात आले. IATO वर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. IATO द्वारे राझदान हॉलिडेजचे कै. एम एल राझदान यांना हॉल ऑफ फेम सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांची सून श्रीमती अनिता राजदान यांनी हा सन्मान स्वीकारला. तसेच इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे ​​एमडी आणि सीईओ पुनीत छटवाल यांनाही हॉल ऑफ फेमने गौरविण्यात आले.

पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र सिंह लोधीही यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, "मध्य प्रदेशने वारसा, सांस्कृतिक, आध्यात्मिक, जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारताच्या मध्यभागी आयोजित करण्यात आलेली आयएटीओची ही परिषद मध्य प्रदेशातील पर्यटनाला जागतिक पातळीवर नेण्यात निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल."

सोहळ्याला उपस्थित पर्यटन आणि संस्कृती विभागाचे प्रधान सचिव शिवशेखर शुक्ला म्हणाले, "IATO चे मध्य प्रदेश अधिवेशन आगामी अधिवेशनांसाठी एक मानदंड निश्चित करेल. त्यांनी मध्य प्रदेशच्या भेटीदरम्यान सर्व IATO प्रतिनिधींचे राज्याचा ऐतिहासिक वारसा, समृद्ध संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याची जवळून माहिती घेण्यासाठी अभिनंदन केले. तसेच देश-विदेशातील पर्यटकांना मध्य प्रदेशात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले."

IATOचे अध्यक्ष श्री राजीव मेहरा यांनी पर्यटन क्षेत्रातील IATO चे महत्व आणि भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली. तर उपाध्यक्ष रवी गोन्साई यांनी आयएटीओ अधिवेशनाची उद्दिष्टे आणि कार्य याबाबत माहिती दिली.

'एन्चँटिंग मध्य प्रदेश: हार्ट ऑफ इंडिया'

मध्य प्रदेश राज्याच्या ऐतिहासिक वैभव आणि नैसर्गिक सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी 'एन्चँटिंग मध्य प्रदेश: हार्ट ऑफ इंडिया' या सादरीकरणाचे संयोजन मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाने केले होते. याचे दिग्दर्शन डॉ. मैत्रेयी पहारी यांनी केले असून ५३ कलाकारांनी यात सहभाग घेत मध्यप्रदेशातील विविध संस्कृतीचे सादरीकरण केले. यावेळी राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक इलय्याराजा टी, पर्यटन मंडळाचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक बिदिशा मुखर्जी, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड IATO चे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह, देशभरातील IATO चे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: India to become hub of global tourism said Union Tourism, Culture Minister Gajendra Singh Shekhawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.