चौथीत शिकणाऱ्या मुलांमध्ये भांडण, तिघांनी मिळून एकाला कंपासने 108 वेळा भोसकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 05:23 PM2023-11-27T17:23:43+5:302023-11-27T17:24:11+5:30

MP News: शिक्षक सुट्टीवर असल्याने मुले गोंधळ करत होते, यावेळी मुलांमध्ये जोरदार भांडण झाले.

indore-students-torched-with-a-compass-in-school | चौथीत शिकणाऱ्या मुलांमध्ये भांडण, तिघांनी मिळून एकाला कंपासने 108 वेळा भोसकले

चौथीत शिकणाऱ्या मुलांमध्ये भांडण, तिघांनी मिळून एकाला कंपासने 108 वेळा भोसकले


MP News: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये खेळताना हाणामारी झाली. यादरम्यान, तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका वर्गमित्राला राऊंडरने (कंपास) 108 वेळा भोसकले. यानेही त्यांचे समाधान झाले नाही, नंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाणही केली. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एरोड्रोम पोलीस स्टेशन परिसरातील गरिमा विद्या शाळेतील हा प्रकार आहे. चौथीचा वर्ग नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेला होता. मात्र वर्गशिक्षक रजेवर होते, यामुळे मुलांची वर्गात मजा मस्ती सुरू होती. यावेळी तीन विद्यार्थ्यांचा वर्गातील एका वर्गमित्राशी वाद झाला. यादरम्यान या तिघांनीही त्याच्या पायावर कंपासने वार केले.

शाळा सुटल्यावर मुलगा घरी पोहोचला आणि त्याने संपूर्ण घटना आई-वडिलांना सांगितली. कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन या प्रकरणाची तक्रार केली असता मुख्याध्यापकांनी संपूर्ण प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण 10 वर्षीय मुलांचे असल्याने पोलिसांनी जेजे कायद्यांतर्गत कारवाई केली आणि चौकशी समिती स्थापन केली आहे. 

या घटनेसंदर्भात तिन्ही मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, शाळा व्यवस्थापनावरही कारवाई केली जाणार आहे.

Web Title: indore-students-torched-with-a-compass-in-school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.