कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याच्या मृत्यू; 11 महिन्यांत 9 चित्ते दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:59 PM2023-08-02T14:59:09+5:302023-08-02T14:59:20+5:30
कुनोतील अधिकार्यांना दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'धात्री' चित्त्याचा मृतदेह आज सकाळी आढळला.
Cheetah Project: केंद्र सरकारच्या महत्वकांशी चित्ता प्रकल्पासमोरील अडचणी थांबायचे नाव घेत नाहीये. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्याच्या पुनर्वसनासाठी सरकारने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात हा प्रकल्प सुरू केला. पण, कुनात आता आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कुनोत जन्मलेल्या तीन पिलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुनो नॅशनल पार्कचे केअरटेकर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता मादी धात्री(तिबिलिसीला) शोधण्यात गुंतले होते. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर धात्रीचा मृतदेह बाहेर सापडला. या मादी चित्त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मुख्य वनसंरक्षक असीम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.
#WATCH | A female cheetah 'Dhatri' has died today. Post-mortem is being conducted to ascertain the case of death. After the post-mortem we can tell the reason behind the death: Aseem Srivastava, Principal Chief Conservator of Forests (Wildlife) on the death of one more cheetah in… pic.twitter.com/SkseGAjzdD
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 2, 2023
मादी चित्ता तिबिलिसीपूर्वी कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ता मरण पावले आहेत. यामध्ये तीन लहान शावकांचाही समावेश आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती, ज्याला उत्तर देताना सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत मृत्यू झालेल्या सर्व चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे, त्यामुळे यात काळजी करण्याचे कारण नाही.
बाहेरुन चित्ते आणले
भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला होता आणि आतापर्यंत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 20 चित्ते आणण्यात आले आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये सर्व चित्ते सोडण्यात आले. यानंतर एका मादीने 4 शावकांना जन्म दिला. यामुळे संख्या 24 झाली होती. मात्र यापैकी 3 शावक आणि 6 प्रौढ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या कुनोत सात नर आणि सहा मादी चित्ते आहेत.