‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:09 AM2024-04-30T10:09:31+5:302024-04-30T10:11:35+5:30
Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: अमित शाह (Amit Shah) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिग्विजय सिंह (Digvijay Singh) म्हणाले की, जे माझी अंत्ययात्रा काढत आहेत, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, मला त्यांच्या या आशीर्वादाची गरज नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल, तेव्हा ते आले तर खूप उपकार होतील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे. अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जे माझी अंत्ययात्रा काढत आहेत, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, मला त्यांच्या या आशीर्वादाची गरज नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल, तेव्हा ते आले तर खूप उपकार होतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना ‘आशिक का जनाजा है जरा धूम से निकले’, असं विधान केलं होतं. त्यावर पलटवार करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जे माझी अंत्ययात्रा काढत आहेत, त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, मला त्यांच्या या आशीर्वादाची गरज नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा निघेल, तेव्हा ते आले तर खूप उपकार होतील. आपल्या देशात संसदीय प्रणाली आहे. येथे जनता आपला लोकप्रतिनिधी निवडते. भ्रष्टाचार समाप्त करण्याची गरज आहे. खरा प्रश्न जनतेच्या अधिकारांचा आहे. ते संपुष्टात आणले जात आहेत, असा टोला दिग्विजय सिंह यांनी लगावला.
दिग्विजय सिंह म्हणाले की, खरा मुद्दा हा सातत्याने वाढत चाललेल्या महागाईचा असला पाहिजे. गरीब त्रस्त आहेत. सुशिक्षित तरुणांना नोकर मिळत नाही आहे. तरुण त्रस्त आहेत. पंचायतींचे अधिकार समाप्त केले गेले आहेत. आज असं सरकार आहे ज्याला जनतेच्या कुठल्या कामाशी देणंघेणं नाही. वारसा कर, मंगळसूत्र आदी विधानांवरूनही दिग्विजय सिंह यांनी मोदी आणि भाजपाला टोला लगावला. प्रचारामध्ये मंगळसूत्र कुठून आलं. मच्छी-मटन कुठून आलं. मुस्लिम लीग कुठून आली. आम्ही गरिबी हटवू इच्छितो. सुशिक्षितांना रोजगार देऊ इच्छितो. महागाई कमी करू इच्छितो. २०० रुपयांत एका कुटुंबायाचा उदरनिर्वाह कसा काय चालू शकतो. मजुरी वाढलेली नाही. खाद्यतेलाची महागाई वाढलीआहे. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली आहे, अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केली.
ते पुढे म्हणले की, जर केंद्रात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं तर मजुरी ४०० रुपये करण्यात येईल. काँग्रेसने नेहमीच गरीब आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ केली आहेत. दुसरीकडे केंद्रातील भाजपा सरकारने मोठमोठ्या उद्योगपतींचं १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला.