शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Lok Sabha Election Result 2024 : भाजपसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ठरले ‘लकी’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 7:10 AM

पक्षाचे कार्यकर्ते या शानदार यशाचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांना देत आहेत.

- अभिलाष खांडेकरभोपाळ : भाजपचा उत्तर प्रदेशचा बालेकिल्ला डळमळला असताना पक्षाची प्रयोगशाळा संबोधल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशने सर्व २९ जागा पक्षाच्या झोळीत टाकून सर्वांना चकित केले आणि एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वाचवली. पक्षाचे कार्यकर्ते या शानदार यशाचे श्रेय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांना देत आहेत.

आपला विस्तीर्ण परिसर भगव्या रंगात रंगवणारे हे देशातील एकमेव मोठे राज्य आहे. जनसंघाच्या काळापासून अस्तित्वात असलेला पक्षाचा हा जुना किल्ला आजही अभेद्य असल्याचे येथील मतदारांनी दाखवून दिले. पक्षाने केवळ सर्वच जागा जिंकल्या नाहीत तर मतांची टक्केवारीही अभूतपूर्व ५९.२६ टक्क्यांपर्यंत नेली आहे. डॉ. यादव यांनी सकार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

बालेकिल्ला हिसकावलाकाँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेला छिंदवाडा मतदारसंघही भाजपने हिसकावून घेतला. तेथे कमलनाथ यांचे पुत्र नकुल यांचा विवेक साहू या नवख्या उमेदवाराने पराभव केला. राजगडमधून निवडणूक हरलेले दिग्विजय सिंह २००३ मध्ये सत्तेतून बाहेर फेकले जाण्यापूर्वी काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. पक्षाचे समर्पित कार्यकर्ते आणि पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीमुळे मध्य प्रदेशात यश मिळाले आहे, असे डॉ. यादव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

सर्व जागा जिंकणारा दुसराच पक्षयापूर्वी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अखंड मध्य प्रदेशात १९८४-८५ मध्ये काँग्रेसने सर्वच्या सर्व ४० जागा जिंकल्या होत्या. तथापि, त्यानंतर पहिल्यांदाच तत्कालीन अखंड मध्य प्रदेश विचारात घेतल्यास एका पक्षाने एकूण ३९ जागा (मध्य प्रदेशातून २९ आणि छत्तीसगडमधून १०) जिंकल्या आहेत.

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल