मध्य प्रदेशमध्ये मतदानादरम्यान काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, तलवारी भिडल्या, ४ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 01:54 PM2023-11-17T13:54:45+5:302023-11-17T13:56:11+5:30

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या मतदानावेळी इंदूरमधील महू येथे भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली आहे. तसेच तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये ४ जण जखमी झाले आहे. 

Madhya Pradesh Assembly Election 2023: Congress-BJP workers clashed, swords clashed during polling in Madhya Pradesh, 4 injured | मध्य प्रदेशमध्ये मतदानादरम्यान काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, तलवारी भिडल्या, ४ जण जखमी

मध्य प्रदेशमध्ये मतदानादरम्यान काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, तलवारी भिडल्या, ४ जण जखमी

मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांसाठी आज मतदान होत आहे. यावर्षी राज्यात सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण संवेदनशील बनले आहे. दरम्यान, मतदानावेळी इंदूरमधील महू येथे भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली आहे. तसेच तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये ४ जण जखमी झाले आहे. 

महू विधानसभा मतदारसंघ हा डॉ. आंबेडकरनगर या नावानेही ओळखला जातो. या मतदारसंघाची लोकसंख्या ४ लाख असून, येथील मतदारांची संख्या २ लाख ६० हजार एवढी आहे. तसेच येथील साक्षरतेचा दर हा ८५ टक्के आहे. हा भाग महू छावणी या नावानेही ओळखला जातो.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये ११ वाजेपर्यंत २८.२५ टक्के मतदान झालं आहे. क्षेत्रवार विचार केल्यास माळवा येथे ३२.३९ टक्के, भोपाळमध्ये १९.३ टक्के, छिंदवाडामध्ये ३०.४९ टक्के, गुनामध्ये २८.७५ टक्के, ग्वाल्हेरमध्ये २२.४४ टक्के, इंदूरमध्ये २१.८३ टक्के, जबलपूरमध्ये २५.९४ टक्के, मुरैनामध्ये २६.८७ टक्के, नरसिंहपूरमध्ये २९.६४ टक्के आणि उज्जैनमध्ये २९.१४ टक्के मतदान झालं आहे.  

Web Title: Madhya Pradesh Assembly Election 2023: Congress-BJP workers clashed, swords clashed during polling in Madhya Pradesh, 4 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.