Madhya Pradesh Assembly Election: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर 'मुख्यमंत्री कोण होणार' यावरुन बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान, निवडणुकीत मतदार पक्षासोबतच उमेदवाराकडे पाहून मतदान करतात. उमेदवाराचे काम आणि त्याचा प्रामाणिकपणा, यावरुन उमेदवाराचे भविष्य ठरते. अशातच भाजपच्या एका प्रामाणिक आमदाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
निवडणुकीदरम्यान प्रत्येक उमेदवाराला पक्षाकडून ठराविक निधी दिला जातो. पण, निवडणुकीत निधीव्यतिरिक्त उमेदवाराला स्वतःचाही पैसा खर्च करावा लागतो. मात्र, उज्जैनच्या नागदा खचरौड येथील डॉ. तेज बहादूर सिंह चौहान यांनी इतर आमदारांसमोर आदर्श मांडला आहे. पक्षाने दिलेल्या 20 लाख रुपयांपैकी 13 लाख रुपये त्यांनी निवडणुकीत खर्च केले. निवडणूक जिंकल्यानंतर उर्वरित 7 लाख रुपये पक्षाला परत केले आहेत.
नागदा-खचरौड विधानसभा निवडणुकीत तेज बहादूर सिंह यांनी काँग्रेसचे दिलीप गुर्जर यांचा 15327 मतांनी पराभव केला. एखाद्या नेत्याने निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने दिलेला पैसा पुन्हा पक्षाला परत केल्याची बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना आहे. याबाबत उज्जैन नागदा-खाचरौड विधानसभेचे मीडिया प्रभारी प्रकाश जैन म्हणाले की, तेज बहादूर सिंह यांना पक्षाच्या निधीतून निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये मिळाले होते. निवडणूक प्रचारादरम्यान आणि निकाल येईपर्यंत त्यांनी केवळ 13 लाख रुपये खर्च केले. यानंतर प्रामाणिकपणा दाखवत उर्वरित सात लाख रुपये भोपाळ कार्यालयात पक्षाला परत केले. तेज बहादूर सिंह चौहान यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पहिल्याच प्रयत्नात निवडणूक जिंकलीपक्षाने त्यांना प्रथमच संधी दिली होती. ही जागा आधी काँग्रेसकडे होती. मात्र, यावेळी जनतेने काँग्रेसला नाकारले. आमदार चौहान यांचा भाजप संघटनेत खोलवर दबदबा आहे, हे विशेष. प्रामाणिक नेता अशी त्यांची परिसरात प्रतिमा आहे. जनतेला त्यांचा स्पष्टपणा आणि प्रामाणिकपणा आवडला. याच कारणामुळे त्यांनी ही निवडणूकही जिंकली मोठ्या मताधिक्याने जिंकली.