'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजने'त ८ लाख ५० हजार युवकांची नोंदणी - शिवराज सिंह चौहान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 01:39 PM2023-08-24T13:39:16+5:302023-08-24T13:39:45+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राबवलेल्या योजनेत तरूणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला सहभाग त्यांनी जनतेसमोर मांडला.
CM Seekho Kamao Yojana : मध्य प्रदेशचेमुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी राबवलेल्या योजनेत तरूणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला सहभाग त्यांनी जनतेसमोर मांडला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंत्रिपरिषदेची बैठक समत्व भवन येथे वंदे मातरमच्या गायनानं सुरू झाली. बैठकीपूर्वी आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना' आज सायंकाळपासून सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
८ लाख ५० हजार युवकांची नोंदणी
तसेच या योजनेत ८ लाख ५० हजार युवकांची नोंदणी झाली असून ही आनंदाची बाब असल्याचे चौहान यांनी नमूद केलं. आज सुमारे १४,००० तरुणांना स्वीकृती पत्रं दिली जाणार असून, त्यामध्ये तरुणांना कौशल्य शिकण्यासाठी कोणत्या संस्थांमध्ये जावे लागेल, याची माहिती दिली जाईल. आजपासून या योजनेला गती मिळणार आहे. ही एक अप्रतिम योजना आहे, जी युवकांना शिकण्यास प्रवृत्त करते, असंही मुख्यमंत्री सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान, 'मुख्यमंत्री सीखो कमाओ योजने'मुळं युवकांच्या कायमस्वरूपी नोकरीचं महत्त्व वाढणार आहे. तसेच शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचा उदरनिर्वाह चालू राहील, त्याची व्यवस्थाही या योजनेत आहे. राज्यातील तरुणांसाठी आजपासून एक नवीन उपक्रम सुरू होत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.