“राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी”; भाजपाचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 06:32 PM2024-03-05T18:32:28+5:302024-03-05T18:34:38+5:30

Rahul Gandhi Vs BJP: जे स्वतःला आणि पक्षाला दिशा दाखवू शकले नाहीत. ते देशाला काय दिशा दाखवणार, अशी टीका भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

madhya pradesh cm mohan yadav said rahul gandhi should apologize for declining ram mandir invitation | “राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी”; भाजपाचे टीकास्त्र

“राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी”; भाजपाचे टीकास्त्र

Rahul Gandhi Vs BJP: प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यापासून भारतासह जगभरात राम मंदिराची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. तर राम मंदिरात आल्यावर भाविक सढळ हस्ते दान, देणगी देत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे दान राम मंदिराला देण्यात आले आहे. राम मंदिरावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. राम मंदिराचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले होते. यावरून भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर टीका करत माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. ही यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. राहुल गांधी उज्जैन येथे बाबा महाकाल दर्शन घेतले आहे. यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राहुल गांधी आणि भारत जोडो न्याय यात्रेवर निशाणा साधला. उज्जैन ही देवदर्शन करण्याची नगरी आहे. त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, त्यांना पश्चाताप व्हायला हवा की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे  निमंत्रण पक्षाने नाकारले. जनतेची माफी मागायला हवी, अशी मागणी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली.

देशाला काय दिशा देणार?

राहुल गांधी यांचे महाकाल दर्शन आणि भारत जोडो न्याय यात्रा याबाबत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देवदर्शनामुळे काही होणार नाही. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी दिशाहीन आहेत. राहुल गांधी स्वतःला आणि पक्षाला योग्य दिशा दाखवू शकत नाहीत. ते देशाला काय दिशा देणार, असा प्रश्न शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. 
 

Web Title: madhya pradesh cm mohan yadav said rahul gandhi should apologize for declining ram mandir invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.