ग्वाल्हेर: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यातील कोट्यवधी लोकांचे लाडके मामा, म्हणजेच शिवराज सिंह चौहान त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी राज्यातील जनतेसाठी असलेली आपली संवेदनशीलता दाखवली आहे. दरम्यान, त्यांनी ग्वाल्हेरच्या मेला मैदानावर आयोजित कार्यक्रमात जनआरोग्य चिकित्सालय नवीन भवन (1000 खाटांचे) आणि ग्वाल्हेरच्या गजराजा वैद्यकीय महाविद्यालयातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासह 777 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, माझा संकल्प आहे की, माझ्या राज्यातील माता-भगिनींच्या डोळ्यात अश्रू येऊ नयेत, त्या कधीही गरीब राहू नयेत. मध्य प्रदेशात 45 लाख लाडक्या लक्ष्मी मुली आहेत. जेव्हा त्या मला मामा-मामा म्हणतात, तेव्हा माझे मन भरुन येते.
भाषण देण्यासाठी नाही, आयुष्य बदलण्यासाठी आलोय: शिवराजमुख्यमंत्री चौहान पुढे म्हणाले की, मी इथे भाषण करायला नाही, तर आयुष्य बदलण्याचा संदेश देण्यासाठी आलो आहे. माझ्या राज्यातील माता-भगिनींच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ नये, असा माझा संकल्प आहे. मी आयुष्य बदलण्याचा मंत्र सांगतोय. घरातील पुरुष बाहेर जातात, मात्र स्त्रिया घरात राहून त्रास सहन करतात. महिलांनीही सरपंच, नगरसेवक व्हायला हवे. निम्म्या जागांवर फक्त बहिणीच लढतील. जर तुम्ही तुमच्या घरातील महिलेच्या नावावर शेत, घर किंवा दुकान खरेदी केले, तर नोंदणीसाठी केवळ 1 टक्के पैसे लागतील. त्यामुळेच त्यांची संपत्ती वाढत आहे.
राज्यात कुणालाही भूमिहीन राहू देणार नाही: शिवराजआपल्या लोकप्रिय शैलीत बोलताना मुख्यमंत्री शिवराज म्हणाले की, मध्य प्रदेशच्या भूमीवर कोणताही गरीब भूमिहीन राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. लाडली बहना योजनेमध्येही हळूहळू वाढ करून तीन हजार रुपये करण्यात येणार आहे. भगिनींचे उत्पन्न दरमहा किमान 10,000 रुपये असावे हा माझा संकल्प आहे, असेही ते यावेळी म्हणाले.