साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 06:03 PM2024-05-25T18:03:38+5:302024-05-25T18:05:58+5:30
Madhya Pradesh Crime News: पत्नीच्या जाचामुळे त्रस्त असलेल्या एका पतीने तक्रार घेऊन थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. सर्वसाधारणपणे महिला ह्या कौंटुंबिक हिंसाचाराची शिकार झाल्याचे दिसून येतात. मात्र मध्य प्रदेशमधील शहडोल येथे एका पतीने पत्नीचे अनैतिक संबंध आणि जाचाची तक्रार घेऊन थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.
पत्नीच्या जाचामुळे त्रस्त असलेल्या एका पतीने तक्रार घेऊन थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. सर्वसाधारणपणे महिला ह्या कौंटुंबिक हिंसाचाराची शिकार झाल्याचे दिसून येतात. मात्र मध्य प्रदेशमधील शहडोल येथे एका पतीने पत्नीचे अनैतिक संबंध आणि जाचाची तक्रार घेऊन थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. माझी पत्नी मला त्रास देते. तसेच माझ्या ८० वर्षांच्या आईला मारहाण करते, असा आरोप त्याने तक्रारीमधून केला आहे. आपल्या पत्नीचे कुठल्यातरी परपुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत. मात्र पोलीस माझी तक्रार दाखल करून न घेता माझ्याविरोधातच गुन्हा दाखल करत आहेत, असा आरोपही त्याने केला आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त होत पीडित पतीने मदतीसाठी विनवणी केली आहे. एवढंच नाही तर पत्नीच्या जाचामुळे वैतागून आपल्या वृद्ध आईसह आत्मदहन करण्याचा इशाराही त्याने दिला आहे.
याबाबत समोर आलेल्या सविस्तर माहितीनुसार जैतपूरमधील पैरीबहरा गावात राहणाऱ्या राजेंद्र कुशवाहा याने त्याच्या पत्नीच्या अनैतिक संबंधांना वैतागून पोलिसांकडे धाव घेतली आहे. राजेंद्र याने या प्रकरणी जैतपूर पोलीस ठाण्यापासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत या प्रकरणाची तक्राद केली आहे. माझ्या पत्नीचे गावातील एका गुंडासोबत अनैतिक संबंध असून, मनाला वाटेल तेव्हा ती त्याच्यासोबत निघून जाते. मग रात्र रात्र घरी येत नाही. तसेच असं करण्यास मनाई केल्यास खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देते. एवढंच नाही तर माझ्या ८० वर्षांच्या वृद्ध आईला मारहाण करते, असा आरोप पतीने केला आहे. दरम्यान, पत्नीने प्रियकरासोबत मिळून आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्याने केला आहे.
आता पत्नीच्या जाचातून सुटका व्हावी यासाठी पीडित राजेंद्र पोलिसांकडे सातत्याने तक्रार करत आहे. मात्र पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी त्याच्याविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. यामुळे दु:खी झालेल्या पतीने वृद्ध आईसोबत पोलीस ठाण्यात धाव घेत मदतीसाठी विनवणी केली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, या पती-पत्नीमध्ये वाद सुरू आहे. तसेच दोघेही एकमेकांविरोधात तक्रारी देत असतात. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.