शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 6:16 PM

MP Election 2023: देशाने विकासविरोधी लोकांना सहा दशके दिली, त्यांनी काहीच कामे केली नाही.

Madhya Pradesh Election: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी (2 ऑक्टोबर) त्यांनी ग्वाल्हेरमध्ये राज्यासाठी 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त  प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली.

'जातीच्या नावावर समाजात फूट...'विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाने विकासविरोधी लोकांना सहा दशके दिली होती. एवढी कामे 9 वर्षात होऊ शकतात, तर 60 वर्षात किती कामे झाली असती. ते काहीच करू शकले नाही, हे त्यांचे अपयश आहे. तेव्हाही ते गरिबांच्या भावनांशी खेळायचे, आजही ते गरिबांच्या भावनाशी खेळत आहेत. तेव्हाही ते जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे आणि आजही तेच पाप करत आहेत. तेव्हाही ते भ्रष्टाचारात बुडाले होते आणि आजही ते भ्रष्टाचारात बुडले आहेत.

'जाती-धर्माच्या नावाने गोंधळ घालतात'पंतप्रधान पुढे म्हणतात, काँग्रेसच्या 'घमंडिया' आघाडीचे नेते महिलांबद्दल किती अपमानास्पद गोष्टी बोलत आहेत, हे आपण रोज पाहत आहोत. महिलांना त्यांचे हक्क मिळावेत असे त्यांना वाटत नाही, म्हणूनच ते अशी वक्तव्ये करतात. ते समाजाला जातीत विभागण्याचे काम करत आहेत. ते धर्माच्या नावाने गोंधळ घालत आहेत. देशाच्या प्रगतीचा द्वेष करणे, एवढेच काम ते करतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

महिला आरक्षणावर भाष्यमहिला आरक्षणावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, अनेक सरकारे आली, लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचे खोटे आश्वासन देऊन आमच्या महिलांकडे वारंवार मते मागितली. पण त्यांनी कधीही कायदा बनववला नाही. संसदेत मोदीने हमी दिली आणि आज 'महिला शक्ती कायदा' प्रत्यक्षात आला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकPoliticsराजकारणcongressकाँग्रेस