सरकारी जमिनीवर मदरशा बांधला, नोटीस मिळताच संचालक घाबरला, स्वत:च मजूर बोलावून पाडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:12 IST2025-04-12T13:10:57+5:302025-04-12T13:12:49+5:30

देशात वक्फ कायदा लागू झाल्यानंतर सरकारी जमीनीवर बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या मदरशावर कारवाई करण्यात आली.

Madhya Pradesh First action under Waqf Act, Illegal madrasa built on government land demolished in Panna | सरकारी जमिनीवर मदरशा बांधला, नोटीस मिळताच संचालक घाबरला, स्वत:च मजूर बोलावून पाडला!

सरकारी जमिनीवर मदरशा बांधला, नोटीस मिळताच संचालक घाबरला, स्वत:च मजूर बोलावून पाडला!

देशात वक्फ कायदा लागू झाल्यानंतर मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका बेकायदेशीर मदरशावर पहिली कारवाई करण्यात आली. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर मदरशा बांधण्यात आल्याची तक्रार मिळताच एसडीएमने संबंधित संचालकाला नोटीस पाठवली. कारवाईला घाबरून संचालकाने स्वत:च मजूर बोलावून मदरशा पाडला. या मदरशाबाबत अनेकदा आक्षेप आणि तक्रारी करण्यात आल्या. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, वक्फ कायदा लागू झाल्यानंतर या मदरशाची चौकशी सुरू करण्यात आली.

मुस्लिम समुदायातील काही लोकांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीडी शर्मा यांच्याकडे या मदरशाबद्दल तक्रार केली. या मदरशात बेकायदेशीर बेकायदेशीर आणि इतर गैरप्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. बीडी शर्मा यांनी ताबडतोब प्रशासनाला कळवून मदरशावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून मदरसा संचालकाला नोटीस बजावण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे कारवाईच्या भितीने मदरशा संचालकाने स्वतः मजूर बोलावून मदरशा पाडला. 

मदरशात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी
मिळालेल्या माहितीनुसार, हा मदरशा पन्ना शहरातील बीडी कॉलनीत येथे सरकारी जमिनीवर बांधण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या मदरशामध्ये बेकायदेशीर कामे आणि इतर गैरप्रकार सुरू होती, असाही आरोप केला जात आहे. मदरशाच्या नावाखाली पैसे गोळा केले जात होते, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

कारवाईला उशीर झाल्याचा आरोप
वक्फ बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल हमीद म्हणतात की, अब्दुल रौफ कादरी नावाच्या एका व्यक्तीने सरकारी जमीनीवर कब्जा केला होता. कादरी हा बाहेरचा माणूस आहे. एसडीएमच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. पंरतु, कोणतीही कारवाई होत नव्हती. हे प्रकरण बीडी शर्मा यांच्याकडे पोहोचल्यानंतर मदरशावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली.

Web Title: Madhya Pradesh First action under Waqf Act, Illegal madrasa built on government land demolished in Panna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.