शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

मध्य प्रदेश सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था सभासदांच्या मानधनात वाढ, होणार तिप्पट लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 4:11 PM

Madhya Pradesh: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या मानधनामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे.

या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधीलशिवराज सिंह चौहान सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या मानधनामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे राज्य सरकारवर दर वर्षी सुमारे ५६ कोटी ३८ लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधींकडून मानधनात वाढ करण्याची मागणी होत होती. ही मागणी मंगळवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पूर्ण केली. गतवर्षी मंगळवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्य केली आहे. गतवर्षी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरपंचांचं मानधन वाढवण्यात आलं होतं. त्यांना आधी १७५० रुपये मानधन मिळत असे. त्यानंतर ही रक्कम वाढवून ४२५० एवढी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली की, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपसरपंच, पंच आदींच्या मानधनामध्ये सुमारे तीन पटीने वाढ करण्यात येत आहे. त्याबरोबरच वाहन भत्ताही वाढवला जाईल. लवकरच या संदर्भातील आदेश त्वरित काढले जाणार आहेत. कुणाच्या खात्यामध्ये किती वाढणार रक्कम- या निर्णयानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच उपसरपंच आणि पंच यांच्या मानधनामध्ये सुमारे तिप्पट वाढ होणार आहे.   - जिल्हा परिषद अध्यक्षांचं मानधन ११ हजार १०० रुपयांवरून वाढवून ३५ हजार रुपये आणि वाहन भत्ता ४३ हजार रुपयांवरून वाढवून ६५ हजार रुपये करण्यात येईल. -  जिल्हा पंचायत उपाध्यक्षांचं मानधन ९ हजार ५०० रुपयांनी वाढवून २८ हजार ५०० रुपये, तसेच वाहन भत्ता ९ हजार रुपयांवरून वाढवून १३ हजार ५०० रुपये करण्यात येत आहे. - पंचायत समिती अध्यक्षांचं मानधन ६ हजार ५०० रुपायांवरून वाढवून १९ हजार ५०० रुपये दरमहा करण्यात आले आहे.- पंचायत समिती उपाध्यक्षांचं मानधन ४ हजार ५०० रुपयांवरून वाढवून १३ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे.- सरपंचांचं मानधन १ हजार ७५० रुपये दरमहा वरून वाढवून ४ हजार ३५० रुपये दरमहा करण्यात आले आहे. - तर उपसरपंच आणि पंचांचं मानधन ६०० रुपयांवरून १८०० रुपये करण्यात आले आहे.  

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेश