मध्य प्रदेश देशाच्या विकासाला गती देत आहे: अमित शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 13:25 IST2025-02-26T13:24:36+5:302025-02-26T13:25:44+5:30
येथे पार पडलेली दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

मध्य प्रदेश देशाच्या विकासाला गती देत आहे: अमित शाह
भोपाळ: उद्योग उभारणीला चालना देण्यासाठी मध्य प्रदेशने केलेल्या उपाययोजनांमुळे भारताच्या विकासालाही गती मिळत आहे. या राज्यात गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. स्थिर आणि सक्षम सरकार, पारदर्शक प्रशासन आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक मूलभूत गोष्टी येथे उपलब्ध आहेत. ईज ऑफ डूइंग बिझनेसच्या माध्यमातून पुढाकार घेणारे मध्यप्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह येथे म्हणाले.
येथे पार पडलेली दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत पूर्ण विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आहे. यात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि मध्यप्रदेश यात महत्त्वाचा वाटा उचलणार आहे. लोकल आणि ग्लोबल स्तरावर प्रगतीसाठी योगदान देण्याचे उल्लेखनीय कार्य मध्य प्रदेशने केले. ही ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट यशस्वी ठरली असून याबाबत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि त्यांच्या टीमने अभिनंदन करत आहे. या समिटमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या करारामुळे मध्य प्रदेशाच्या विकासाला गती लाभणार आहे. या समिटमध्ये २०० हून अधिक कंपन्याचे प्रतिनिधी, ६० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते समारोप झाल्यामुळे मध्य प्रदेशला चांगले मार्गदर्शन लाभले आहे.