जबलपूर - निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचे प्रकार पाहायला मिळतात. मात्र, मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये वेगळेच चित्र आहे. येथील काॅंग्रेसचे उमेदवार दिनेश यादव हे लाेकांकडे व्हाेट अर्थात मतांसाेबतच नाेट म्हणजेच पैसे मागत आहेत. त्यांच्या या प्रचाराचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल झाला आहे.केंद्र सरकारने त्यांच्या पक्षाचे खाते गाेठविले आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नाहीत, असे यादव म्हणत आहेत. यादव हे लाेकांकडून १० ते १०० रुपयांची मदत स्विकारत आहेत.
व्हाेटसाेबत नाेटही द्या, उमेदवाराचा प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:50 IST