संतापजनक! एका गरीब व्यक्तीवर युरीन करतानाचा VIDEO व्हायरल; CM शिवराज म्हणाले, धडा शिकवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 08:19 PM2023-07-04T20:19:36+5:302023-07-04T20:20:56+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात घडली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. येथे हातात सिगारेट असलेली एक मद्यधुंद व्यक्ती, पायऱ्यांवर बसलेल्या एका व्यक्तीवर युरीन (लघवी) करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात घडली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. ट्विट करत मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले, 'सिधी जिल्ह्यातील एक व्हायरल व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे. यानंतर मी, दोषीला अटक करून, कडक कारवाई करण्यात यावी आणि एनएसए देखील लावण्यात यावा. अशी सूचना प्रशासनाला दिली आहे."
मेरे संज्ञान में सीधी जिले का एक वायरल वीडियो आया है...
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 4, 2023
मैंने प्रशासन को निर्देश दिए हैं कि अपराधी को गिरफ्तार कर कड़ी से कड़ी कार्रवाई कर एनएसए भी लगाया जाए।
पायऱ्यांवर बसलेल्या व्यक्तीच्या तोंडावर केली लघवी -
व्हायरल होत असलेल्या या व्हडिओत एक गरीब व्यक्ती पायऱ्यांवर बसलेली दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत. निळी जीन्स आणि चेक्सचा शर्ट घातलेला एक माणूस तिच्यासमोर उभा आहे. तो सिगारेट ओढत या गरीब व्यक्तीच्या तोंडावर लघवी करत आहे. लघवी करणारा माणूस दारूच्या नशेत असल्याचे दिसते. एवढेच नाही, तर मद्यधुंद अवस्थेत लघवी करणारा माणूस एका भाजप नेत्याच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. मात्र याची पुष्टी झालेली नाही.
क्या इसकी गिरफ़्तारी हो गई है ? pic.twitter.com/0N8OTnYDtD
— Gurpreet Garry Walia (@GarryWalia_) July 4, 2023
शिवराज यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल -
याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या आदेशानंतर, सिधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एनएसएची कारवाईही केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, नॅशनल सिक्योरिटी अॅक्ट (NSA) या कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीपासून दोशाला धोका आहे, असे सरकारला वाटत असेल, तर त्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते.