शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

भावाच्या मार्कशीटवर मिळवली सरकारी नोकरी; 43 वर्षांनंतर झाली पोलखोल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 6:43 PM

निवृत्तीच्या काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्याची फसवणूक समोर आली.

ग्वाल्हेर:मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून फसवणुकीचे विचित्र प्रकरण समोर आले आहे. महानगरपालिकेत कर्मचाऱ्याने 43 वर्षे सहाय्यक वर्ग-3 पदावर नोकरी केली. त्याची निवृत्तीची वेळ जवळ आली होती. निवृत्तीनंतर आयुष्य सुखकर होईल, असे त्यांना वाटत होते, पण एका तक्रारीने सर्व काही उद्ध्वस्त केले.

हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेर महापालिकेतील सहाय्यक वर्ग-3 कर्मचारी कैलाश कुशवाह यांचे आहे. कुशवाह यांनी जून 1981 मध्ये भाऊ रणेंद्र कुशवाह यांच्या मार्कशीटचा वापर करून ग्वाल्हेर महापालिकेत नोकरी मिळवली. विशेष म्हणजे, 43 वर्षे त्यांनी नोकरी केली, पण एका तक्रारीमुळे त्यांची पोलखोल झाली.

अनेक वर्षांनंतर अशोक कुशवाह नावाच्या व्यक्तीने महापालिकेत या फसवणुकीची तक्रार केल्यावर कैलास कुशवाहाचे सत्य समोर आले. ही माहिती समोर आल्यावर कैलाश कुशवाह यांना ऑगस्ट 2023 मध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यानंतर महापालिकेचे उपायुक्त अनिल दुबे यांनी कैलास कुशवाहाविरोधात विद्यापीठ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी कैलाश कुशवाहाविरुद्ध कलम 420,467, 468  आणि 471 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

भाऊही सरकारी नोकर विशेष म्हणजे कैलाश कुशवाह यांचा भाऊ रणेंद्र सिंह कुशवाह हे देखील सरकारी नोकरीत आहेत. ते राज्य यंत्रमाग विणकर सहकारी शाखा, ग्वाल्हेर येथे कार्यरत आहेत. दोन्ही भाऊ एकाच मार्कशीटवर सरकारी नोकरी करत होते. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर विभागात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशfraudधोकेबाजीMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिस