शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 5:43 AM

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : मध्य प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराने  राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र, भाजप आणि काॅंग्रेसने अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. दाेन्ही पक्ष आधी एकमेकांच्या जाहीरनाम्यावर लक्ष ठेवून आहेत. यावरून ‘पहले आप’चा खेळ सुरू असून, सातत्याने जाहीरनामा प्रसिद्ध हाेण्याच्या तारखा दाेन्ही पक्ष बदलत असल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काॅंग्रेसमध्ये थेट लढत आहे.  मतदानाच्या चार दिवस आधी छत्तीसगडमध्ये भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काॅंग्रेसने त्यांचे वचनपत्र जाहीर केले. काॅंग्रेसने भाजपनेच दिलेल्या आश्वासनांचे मूल्य वाढविले. म्हणूनच मध्य प्रदेशात दाेन्ही पक्ष सावध आहेत. समाेरचा काय जाहीर करताे, हे पाहून आपला जाहीरनामा तयार करीत असल्याचे दिसत आहे.

जिंकण्यासाठी माेठ्या हव्यात घाेषणाराजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशाेक गेहलाेत यांनी यापूर्वीच १०० युनिट वीज माेफत, शेतकऱ्यांची कर्जमाफी, माेफत धान्य वितरण यांसारख्या घाेषणा केल्या आहेत. त्यांना शह देण्यासाठी भाजपला यापेक्षा माेठ्या घाेषणा करणे आवश्यक आहे.

छत्तीसगडमध्ये काय झाले?- काेणता पक्ष काय माेफतच्या याेजना देणार, यावरच निवडणूक लढविण्यात येत असल्याचे दिसत आहे. - भाजपने छत्तीसगडमध्ये धानाला ३,१०० रुपये भाव देण्याची घाेषणा केली; तर काॅंग्रेसने दुसऱ्याच दिवशी हा भाव ३,२०० रुपये करण्याचे आश्वासन दिले. - भाजपने तेंदुपत्ता संकलन करणाऱ्यांना ५,५०० रुपये, तर काॅंग्रेसने ६ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.- दाेन्ही पक्षांनी घरगुती गॅस सिलिंडर ५०० रुपयांत देण्याची घाेषणा केली असून, १० लाख रुपयांपर्यंतचा उपचार माेफत करण्याचेही जाहीर केले आहे.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक