मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांनी आपली ताकद निवडणूक प्रचारात झोकून दिली आहे. भाजप आणि काँग्रेस दोघेही आपापल्या विजयाचा दावा करताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष जनतेत जाऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच, इंडिया टीव्हीने एक ओपिनियन पोल प्रसिद्ध केला असून ते आश्चर्यचकित करणारा आहेत.
कुणाला किती जागा? -इंडिया टीव्हीच्या ओपिनियन पोलनुसार, मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. यात भाजपच्या तुलनेत काँग्रेस अधिक सरस वाटत आहे. या ओपिनियन पोलनुसार, मध्य प्रदेशात भाजपला 102 ते 110 जागा, तर काँग्रेसला 118 ते 128 जागा मिळू शकतात. याशिवाय इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
काय सांगतो टाइम्स नाऊ-नवभारत आणि इटीजीचा सर्व्हे? -तत्पूर्वी, टाइम्स नाऊ-नवभारत आणि इटीजीने प्रसिद्ध केलेल्या या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे शिवराज सिंह चौहान यांचे नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री आणि खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतरही विधानसभेची निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यत आहे. तर काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये बहुमतासह बाजी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व्हेतील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात आज निवडणूक झाल्यास, भाजपाला 42.8 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला 43.8 टक्के मते मिळू शकतात. तसेच, इतर पक्षांच्या खात्यात 13.40 टक्के मते जाण्याची शक्यता आहे. या मतांच्या टक्केवारीचे जागांमध्ये रूपांतर केल्यास राज्य विधानसभेच्या 229 जागांपैकी भाजपाला 102 ते 110 तर काँग्रेसला 118 ते 128 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, इतर पक्षांच्या खात्यात 2 जागा जाऊ शकतात.