केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल यांच्या कारला अपघात, एका व्यक्तीचा मृत्यू तर तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 05:52 PM2023-11-07T17:52:21+5:302023-11-07T17:53:05+5:30
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने जात होता.
Union Minister Prahlad Patel Accident : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (Prahlad Patel) यांचा मंगळवारी (दि.7) अपघात झाला. या अपघातात पटेल थोडक्यात बचावले, त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र या घटनेत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH | Union Minister and BJP candidate from Narsinghpur, Prahlad Patel's convoy meets with a road accident in Amarwara of Chhindwara district in Madhya Pradesh. The minister was travelling from Chhindwara to Narsinghpur. pic.twitter.com/bFGV5dLIEN
— ANI (@ANI) November 7, 2023
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा ताफा छिंदवाडाहून नरसिंगपूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी त्यांचे वाहन अचानक रस्त्यावरुन खाली उतरले. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री पटेल छिंदवाडा येथे आले आहेत. छिंदवाडा येथून जनसंपर्क अभियान आटोपून ते नरसिंगपूरला परतत असताना हा अपघात झाला.
VIDEO | The car of Union minister @prahladspatel met with an accident in MP's Chhindwara earlier today, in which a man was reported severely injured. More details are awaited. pic.twitter.com/FWDNnFJUR7
— Press Trust of India (@PTI_News) November 7, 2023
प्रल्हाद पटेल हे नरसिंगपूरमधून उमेदवार आहेत
प्रल्हाद सिंग पटेल हे 7 जुलै 2021 पासून भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री आहेत. ते मध्य प्रदेशातील दमोह लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1996, 1999, 2014 आणि 2019 मध्येही खासदार झाले. आता भाजपने त्यांना मध्य प्रदेश विधानसभेचे तिकीट दिले आहे.