मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या सातपुडा इमारतीला लागलेली आग तब्बल १४ अथक परिश्रमानंतर विझवण्यात यश आलं. आग विझवल्यानंतर लष्कर आणि अग्निशमन दलाच्या पथकाला इमारतीच्या आत जाऊन परिस्थितीची माहिती घ्यायचा होता, मात्र पोलिस आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टीने परवानगी दिली नाही. दरम्यान, आता आग आटोक्यात आल्याचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितलं. सीआयएसएफ, लष्करासह सर्व यंत्रणांनी आग विझवण्यात आग विझवण्यात अथक परिश्रम केले.
आमच्याकडे जे काही साधनसामग्री होती त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आता घाबरण्याचं कारण नाही. आग आता पूर्णपणे आटोक्यात आली आहे. लष्कर आणि अग्निशमन दलाचे पथक इमारतीच्या आत जाऊन तपासणी करणार आहेच. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नसल्याची महिती भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनी दिली.
सोमवारी लागली आगभोपाळच्या सतपुडा इमारतीला गेल्या सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कार्यरत असलेल्या आदिवासी कल्याण विभागाच्या कार्यालयातील एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग काही वेळातच सातपुडा इमारतीत कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. दरम्यान, विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीनं सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.