मध्य प्रदेश निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार! भाजप ६० आमदारांची तिकिटे कापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:55 PM2023-08-29T19:55:58+5:302023-08-29T19:57:18+5:30
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखली आहे. सर्व २३० विधानसभा जागांवर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
काही दिवसातच मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजप निवडणुकीसाठी रणनीती तयार करत आहे. एकीकडे पक्ष पाच जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे, निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखताना यावेळी भाजपनेही अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशातील २३० विधानसभा जागांवर भाजपच्या निवडणूक सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
एकनाथ खडसेंच्या लेकीवर शरद पवारांनी टाकला विश्वास; पक्षाकडून दिली मोठी जबाबदारी
सध्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या जागांवर भाजपचे विशेष लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा १२७ जागा आहेत. या जागांवर पक्षाकडून विशेष सर्वेक्षण केले जात आहे. पक्ष गुजरातचा फॉर्म्युला स्वीकारू शकतो. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप सुमारे ६० आमदारांचे तिकीट कापू शकते. ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत असू शकते, म्हणजे ६० हून अधिक आमदारांचे तिकीटही कापले जाऊ शकते.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याची ही पहिलीच वेळ असेल. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यमान आमदारांना राज्यात कधीही तिकीट नाकारण्यात आलेले नाही. विधानसभा निवडणुकीत तुलनेने ४० टक्क्यांहून अधिक तरुण आणि नवे चेहरे उतरवण्याची भाजपची तयारी असल्याचे बोलले जात आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची निवडणूक रणनीती तयार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मागील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. भाजपने २०२४ मध्ये राज्यातील २९ पैकी २९ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.